Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

whats app message
, शुक्रवार, 6 जुलै 2018 (12:31 IST)
सकाळच्या धामधुमीत असली की फक्त जरा गरमागरम डब्यांची झाकणे लावा. पोरांची तयारी करते तेव्हा जरा बॅग उचलून हातात द्या. ऑफिसला निघताना "आज लवकर येतो " असं जरा हसून म्हणा. ऑफिसला गेल्यावर एक मीस कॉल देऊन कळवा पोहचलो ग व्यवस्थित. उगाच तिला असाच छान नवरा बायकोचा विनोद पाठवा. संध्याकाळी घरी आलात की हसून तिला मिठीत घ्या.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधीतरी सुट्टीच्या दिवशी तिला निवांत झोपू द्या. आवडीचा नाश्ता आणि चहा बनवून मग तिला उठवा. उगाच काही कारण नसताना तिच्या आई वडिलांशी बोला. तिला फोन देताना मात्र "झालं बरं माझं तक्रार करून" असं उगाच चिडवा. तिच्या मित्र मैत्रिणीच्या टवाळक्या चर्चेत उगाच तिला टाळी द्या.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधी फावल्या वेळेत "बस जरा डोक्याची मालिश करून देतो" म्हणा. कधी ती अंघोळ करून आली की लाडाने तिचे केस पुसत गप्पा मारा. तिच्या प्रत्येक ओल्या बटीला अलगद कळून येईल असे खेचा. चिडणार नाही ती, " काय रे तू पण, बघ ना जरा नीट" म्हणून खोटा त्रागा करते. हसून जिरवा.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधी किचन मध्ये गुरफटली असेल तर उगाच जाऊन तिथे भुणभुण घाला. कधीतरी आईपेक्षा काही चांगला स्वैंपाक केलाय बिनधास्त सांगा. एका हाताला तिला घेऊन दुसऱ्या हाती लेकराला घेऊन भर बाजारात चाला. न आवडत्या शॉपिंगला पण "तुझी चॉईस भन्नाट बाबा" असं म्हणून जिरवा. 
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
तिला जास्त काही लागत नसतं. तिची ती खूप समर्थ आहे. पण ती वेडी खूप भावनिक असते. गुंतून पडलेली असते तुमच्या क्षणाक्षणामध्ये. तुम्हालाही तिच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षण असते ह्याची तिला  जाणीव करून देत राहा. जगण्याची कारणे खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे कारण ती आहे हे तिला कधीतरी कळू द्या.
 
तिच्यावर प्रेम करणं खरंच जास्त अवघड नाहीये....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना आणि राजकुमारमध्ये तू तू मैं मैं