आई सारखी दुसरी माय असते
आई जन्माला पुरत नसते
म्हणूनच एक लेक हवी असते!
लहानपणी तीच्या खेळण्यात
आपलं बालपण शोधता येतं
तीच्या makeup box सोबत
आपलंही makeover होतं
आई बाबांना जोडणारी ती एक दुवा असते,
म्हणूनच एक लेक हवी असते!
मनातलं सगळं गुपीत
सहज तीला सांगता येतं
शंकेच निरसनंही
तीच्या कडुन मीळू शकतं
तीच्या वया सोबत आपणही update होत असतो,
म्हणूनच एक लेक हवी असते!
ती हक्काने आपली साथ
देत असते आनंदात
तशीच आपल्या चुकाही
समजावत असते हळूवार
मी माञ तीला ग्रुहीत धरत असते,
म्हणूनच एक लेक हवी असते!
एक दिवस तीला सासरी जायचं असतं
परकं घरंही आपलंसं करायचं असतंं
आपल्याच संस्काराचा वारसा
ती पुढे चालवंत असते
मी तीचं व ती माझं माहेर जपत असते,
आणि म्हणूनच एक तरी लेक नक्कीच हवी असते!!
सौ. सीमा अनिल खेडलेकर