Daily Horoscope
✕

रफू...

Webdunia
गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (11:39 IST)
एक मित्र भेटला परवा... 
खूप जुना... 
बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... 
नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... 
म्हणाला, "मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."
 
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. 
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा 'आलासच ना अखेरीस' हा माज ठेऊन. 
 
तो मला म्हणाला, 
"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली... 
काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास... 
ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं... 
आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता... 
वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली... 
त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच... 
मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन... 
तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'... 
ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी... 
नाही शिवू शकलो मी ते भोक... 
नाही करु शकलो रफू... 
नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छीद्र... 
माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...! 
गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत... 
'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात...  
म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे... 
आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला... 
यावेळी तू आपलं नातं 'रफू' केलेलं पहायला... 
त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला". 
 
सुन्न होऊन ऐकत होतो मी... 
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 
'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो', चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 
'तो' त्याने नकळत केलेल्या 'पापातून' अन् 'मी' नकळत दिलेल्या 'शापातून' ऊतराई होऊ बघत होतो... 
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 
दोघं मिळून एक नातं, नव्याने 'रफू' करू पाहत होतो!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments