Dharma Sangrah

बॅग कशी भरायची

Webdunia
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (12:47 IST)
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
फापट पसारा आवरून सारा, 
आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !
 
याच्या साठी त्याच्या साठी, 
हे हवं, ते हवं 
इथे तिथे - जाईन जिथे, 
तिथलं काही नवं  नवं 
हव्या हव्या चा हव्यास आता 
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती 
आता फक्त ठेवायची आहे ! 
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे ! 
 
अपेक्षांच्या ओझ्याखाली 
आजवर त्रस्त होतो 
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये 
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो 
काय राहिलं, कुठे ठेवलं 
आठवून आठवून पाहत होतो 
त्या त्या वेळी ठीक होतं 
आता गरज सरली आहे, 
कुठे काय ठेवलंय ते ते 
आता विसरून जायच आहे 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
खूप जणांनी खूप दिलं 
सुख दुखाःचं भान दिलं 
आपण कमी पडलो याचं 
शल्य आता विसरायचं आहे !
 
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे ! 
 
आत बाहेर काही नको 
आत फक्त एक कप्पा, 
जना - मनात एकच साथी 
सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 
 
सुंदर त्याच्या निर्मिती ला 
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत 
अलगद उठून जायचं आहे 
 
बॅग कशी भरायची ते 
आता मला कळले आहे !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

नवीन

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments