अभ्या " मुलगीच " झाली रे . मित्राने फोन केला , तो ही परदेशातून ...
बातमीच नुसती ती , आनंदाची की दुःखाची कशी ठरवणार ? त्याच्या बोलण्यात मात्र खंत जाणवत होती . पहिल्या मुलीनंतर त्याला मुलाची अपेक्षा सहाजिक होती . पण "मुलगीच" झाली रे , बोचत होतं कुठतरी आतमधे मला .
मी नुसताच हसलो .. अभिनंदन , साल्या नशीबवान आहेस , मुलांच्या सेटलमेंट च टेंशन नाही , की म्हतारपणात लाथा नाहीत . मी विषयाला हात घातला . तुझ ठीक आहे रे , बोलण सोपं आहे दोन्ही मुलींवर थांब म्हणुन... त्याचा आवाज अजुन खोल होत गेला .
मग मात्र मी त्याला थेट भिडायचं ठरवलं .... तुम्ही दोघे भाऊ ना रे , आणि एक बहिण . तुम्ही दोघ परदेशात आणि बहिण एकटीच इथे ना ??
तो हो म्हणाला. तुझ्या आईची अँजोप्लास्टी झाली ना रे दोन महिन्या पूर्वी . तुम्ही दोघे आला नाहीत . मी गेलो होतो काकुंना भेटायला . तुझी बहिण सासरी राहून सगळ पहात होती रे , अगदी मना पासुन . तुम्हा दोघा भावांपैकी एकाला ही वेळ नव्हता रे ! तुला माहीत आहे काकू निघताना काय म्हणाल्या ?? देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने . . .
बस्स !!! खूप वेळ शांतता...
आणि नंतर फक्त दोनच शब्द.....
सॉरी यार.