Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

न बोले तुम ना मैने कुछ कहा...

न बोले तुम ना मैने कुछ कहा...
, बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:39 IST)
आपल्या जगण्याच्या सर्कशीत किती गोष्टी आपण miss करतो ना...!
 
कधी कधी वाटतं माणूस फक्त नातं टिकवायचा प्रयत्न करतो पण त्याऐवजी त्या नात्यातला जिवंतपणा टिकवायचा जर प्रयत्न केला तर नातं छान बहरतं फुलतं... सुगंधी होतं....
 
पण होतं काय ना... चार माणसाच्या कुटुंबात नवऱ्याला वाटतं बायकोचं कौतुक केलं तर बायको डोक्यावर बसेल नी बायकोला वाटतं नवऱ्याचं कौतुक केलं तर तो डोक्यावर बसेल...
 
आणि नवरा बायको दोघांनाही वाटतं, मुलांचं कौतुक केलं तर ते डोक्यावर बसतील...
 
पण माणसाच्या अनेक चुकीच्या विचारांपैकी हाही एक विचार आहे...
 
Appreciation always gives us strength...
चार दिवसांच्या आयुष्यात माणुस कितीदा विचार करतो की एक दिवस मी माझ्या लाईफ पार्टनरला नक्की सांगेन की ती किंवा तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे...
 
अरे पण हा एक दिवस माहितीये का तुला मिळणार आहे की नाही...???
 
त्यामुळे जेव्हा जे वाटेल ते बोलून दाखवलं तर जगायला मजा येते, शक्ती मिळते...
 
हा विचार आपण का करत नसू... देवच जाणे...!
 
करा की कौतुक... म्हणा... 
 
"भाजी छान झालीये..."
 
"घर किती छान ठेवलंस..."
 
"साडी छान दिसतीये..."
 
"कानातलं छान दिसतंय..."
 
"पोळी किती मऊ करतेस..."
 
"मुलांची किती काळजी घेतेस....."
 
अरे फुकटच तर आहे हे सगळं...
मग होऊन जाऊ द्या की जोरात....
 
बायकांच पण तेच... 
म्हणा की जरा नवऱ्याला...
 
"थकलात का... किती टेन्शन घेता..."
 
"शर्ट छान दिसतोय... स्मार्ट दिसताय..."
 
"ड्राईव्ह किती छान करता..."
 
"फळं मस्तच आणता..."
 
"स्ट्रेस किती हुशारीने हँडल करता......"
 
हे कौतुकाचे दोन शब्द एकमेकांना शंभर हत्तीचं बळ देतात...
 
पण आपला हात मात्र अखडताच असतो appreciate 
करायच्या बाबतीत...
 
हं... पण ओरडताना, एकमेकांचे ऊणेदुणे काढताना मात्र सगळं कसं दिलखुलास चालू असतं...!!!
 
माणूस का असं वागत असेल हे एक कोडंच आहे...!
 
तेच आपण आपल्या आई वडिलांच्या बाबतीतही करतो... अरे म्हणा की एकदा आईवडिलांना... 
 
"किती केलंत आमच्यासाठी...!"
 
त्यांचे कान तरसतात मुलांकडून दोन गोड शब्द ऐकण्यासाठी...
 
असो.........
 
व्यक्त होणं आयुष्यात खुप महत्वाचं असतं... मग ते कुणाबद्दलही का असेना...
 
वेळ न घालवता तेव्हाच्या तेव्हाच ते करायला हवं...
प्रेम व्यक्त करायलाच हवं...
माणूस फक्त भावनांचा भुकेला असतो. बाकी तर सगळं चालुच असतं...
 
शेवटी आपण जगत कशासाठी असतो हो...? फक्त मशीनसारखं काम करण्यासाठी थोडंच जन्माला आलोय...!!!
 
एक हलकसं स्माईल...
 
एक प्रेमळ नजर....
 
एक जादुची झप्पी...
 
दोन कौतुकाचे शब्द...
 
यात एवढी जादू आहे ना जी आपल्या आयुष्याचं सोनं करेल...!
 
पण ह्या फुकट असलेल्या गोष्टी करण्यात माणुस सगळ्यात जास्त कंजुसी करतो.
 
बरं झालं या गोष्टींना पैसे लागत नाहीत नाहीतर त्या या जगातूनच नष्ट झाल्या असत्या...!!!
 
कौतुक करण्याची appreciate एकही संधी सोडायची
नाही हे आतातरी मी नक्की ठरवलंय.....
 
बघू काही चेंजेंस होतात का आयुष्यात...
 
नाहीतर असं होऊ नये की आपल्यालाच
म्हणावं लागेल....
 
न बोले तुम 
ना मैने कुछ कहा...!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सोहम आहे फिटनेस ट्रेनर