कामवाली बाई काचेची भांडी घासत असेल तर तिच्याशी तिच्या मुलांबद्दल, त्यातल्या त्यात त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी बोलाव्यात. बाईचं मन कोवळं, कोवळं होतं लगेच. काचेची भांडी हळूवार घासली जातात.....
ती भाजीच्या कढया , जळलेली, करपलेली दुधाची भांडी घासत असेल तेव्हा तिच्या सासूचा, जावांचा, भावजयींचा विषय काढावा. तावातावाने तोंड आणि हात चालतात. भांडी स्वच्छ निघतात.....