Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंदी आनंद गडे !

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:26 IST)
आनंदी आनंद गडे !
इकडे तिकडे चोहिकडे 
 
वरती खाली मोद भरे 
वायूसंगे मोद फिरे 
नभांत भरला 
दिशांत फिरला 
जगांत उरला 
मोद विहरतो चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हसते आहे 
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे 
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले 
इकडे तिकडे चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
नीलनभी नक्षत्र कसे
डोकावुनि हे पाहतसे 
कुणास बघते ? मोदाला; 
मोद भेटला का त्याला ? 
तयामधे तो, 
सदैव वसतो, 
सुखे विहरतो 
इकडे तिकडे चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
वाहति निर्झर मंदगती
डोलति लतिका वृक्षतती 
पक्षी मनोहर कूजित रे
कोणाला गातात बरे ? 
कमल विकसले 
भ्रमर गुंगले
डोलत वदले 
इकडे तिकडे चोहिकडे 
आनंदी आनंद गडे !
 
स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात 
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो 
द्वेष संपला
मत्सर गेला
आता उरला 
इकडे तिकडे चोहिकडे 
आनंदी आनंद गडे !

कवी- बालकवी(त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुलांसाठी खास बनवा आंबट-गोड पास्ता रेसिपी

उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा

बारावी नंतर समाजशास्त्रात BA करायचे असेल तर कोणते विषय घ्यावे लागतील जाणून घ्या

Hair Care:स्प्लिट एंड्सची समस्या असेल तर घरीच हे उपाय करा

उन्हाळ्यात लिंबाचा रस पिताना या सामान्य चुका करू नका

पुढील लेख
Show comments