Festival Posters
✕

कशासाठी पोटासाठी

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:35 IST)
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

LLM Criminal Law करून बनवा कायद्याच्या क्षेत्रात दमदार करिअर! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस, करिअरची व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू नयेत? तज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ सौंदर्य मंत्र नक्की पाळा!

शाही तुकडा आणि बासुंदी: दिवाळीच्या पाहुण्यांसाठी झटपट बनणारे खास स्वीट डिश

पुढील लेख
Show comments