बालपण एकदाच मिळतं, "मनसोक्त"जगून घ्यावं,
पाऊस आला की स्वच्छन्द हुंदडून घ्यावं,
छपचप उड्या पाण्यात मारण्याची मज्जा, काय वर्णावी जादू त्याची,
सर नाही हो त्याची कशाला च यायची!
मन अलगद उडू लागतं, भिजतं पाण्यात,
बिना पंख वीचरू लागतं ते मुक्त आकाशात,
अनमोल हे क्षण, त्याचं मोल पैशात कसं मोजवं,
बालपण असंच निर्व्याज जगून मात्र घ्यावं,
या ना तुम्हीही माझ्या सवे, व्हा मनानं लहान,
बघा कित्ती सुख दडलंय , त्यात खूप महान!!