Dharma Sangrah

Akbar Birbal Story : आकाशात किती तारे असतील!

वेबदुनिया
राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, ''बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?''

यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्‍या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला.

थोड्या वेळाने मोहर्‍या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, ''खाविंद, जेवढ्या मोहर्‍या या परातीत आहते, बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्‍या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्‍यांची संख्या समजेल. ''

यावर बादशहा म्हणाला, ''बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्‍या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही. ''
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

कोणत्या हार्मोन्समुळे महिलांचे वजन वाढते? त्याची कारणे, लक्षणे, उपाय जाणून घ्या

मायग्रेन वर नियंत्रण मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

अकबर-बिरबलची कहाणी : गोड शिक्षा

पुरुषांची प्रजनन क्षमता खरोखरच कमी होत आहे का? वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा!

Birthday Wishes for Friend in Marathi for Girl मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments