Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अकबर बिरबल कहाणी : आर्धे बक्षीस

अकबर बिरबल कहाणी : आर्धे बक्षीस
, मंगळवार, 23 मार्च 2021 (19:25 IST)
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बादशहा अकबर आणि बिरबल प्रथमच भेटले होते. त्या वेळी बिरबल ला महेश दास म्हणून ओळखले जात होते. एके दिवशी बादशहा अकबर महेश दास म्हणजेच बिरबलाच्या चातुर्याने प्रभावित होऊन आपल्या दरबारात बक्षीस घेण्यासाठी बोलावतात आणि निशाणी म्हणून आपली अंगठी त्याला देतात. 
काही दिवसानंतर महेश दास बादशहांना भेटण्यासाठी जातात. महालात जाऊन ते बघतात की भलीमोठी रांग असते आणि तिथला पहारेकरी प्रत्येकाकडून काही न काही भेटवस्तू घेऊनच त्याला आत सोडत आहे.

महेश दास ची पाळी आल्यावर त्या पहारेकरीने त्याला अडविले आणि आत जाण्याचे कारण विचारले .तेव्हा महेश दास ने सांगितले की बादशहा ने मला बक्षीस घेण्यासाठी बोलाविले आहे बघा ही अंगठी .त्या पहारेकरीच्या मनात लोभ आला.त्याने विचार केला की ह्याला तर खूप बक्षीस मिळेल. त्याने लगेच महेशदास ला म्हटले की ठीक आहे तू आत जाऊ शकतो,परंतु  माझी अट आहे की तुला जे काही बक्षीस मिळेल त्यातून तू मला आर्धे देशील. तुला मान्य असेल तरच तू आत जाऊ शकतो. 

त्यांनी  होकार दिला आणि आत गेले आणि आत जाऊन थांबले. त्यांची पाळी आल्यावर बादशहाने त्यांना ओळखले आणि दरबारात त्यांच्या चातुर्याची प्रशंसा केली. त्यांनी महेश दास ला विचारले की आपल्याला काय पाहिजे. त्यावर त्यांनी मला बक्षीस म्हणून 100 चाबकाचे फटके द्यावे. बादशहा ने त्याला आश्चर्याने विचारले की आपण असे बक्षीस का मागत आहात. तेव्हा बाहेर जे काही घडले ते सर्व त्यांनी बादशहाला सांगितले आणि पहारेकरी काय बोलला आणि त्याच्या वर्तन बद्दल सार काही बादशहाला सांगितले .नंतर महेशदास म्हणाले की मी कबूल केले होते त्या प्रमाणे मला अर्ध बक्षीस म्हणजे 50 चाबकाचे फटके दिल्यावर उर्वरित 50 चाबकाचे फटके त्या पहारेकरी ला द्यावे. बादशहा खूप संतापले आणि त्यांनी त्या पहारेकरी ला बोलावून शिक्षा म्हणून 100 चाबकाचे फटके दिले आणि महेश दासच्या चातुर्यने प्रभावित होऊन त्याचे नाव बिरबल ठेवले. आणि आपल्या दरबारात त्यांची नेमणूक मुख्य सल्लागार म्हणून केली. त्या नंतर आजतायगत अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे.
 
शिकवण- आपण आपले कार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही लोभाशिवाय केले पाहिजे. आपण काहीतरी मिळविण्याच्या आशेने काहीतरी केले तर आपल्याला नेहमीच वाईट परिणाम भोगावे लागतात. जस की त्या लोभी पहारेकरी बरोबर झाले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चविष्ट काश्मिरी दम आलू