Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर-बिरबलची कहाणी : कोण शहाणा, कोण मूर्ख ?

Akbar-Birbal
, शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (20:30 IST)
Kids story : दरबारातील मंडळींना एकदा बादशहाने विचारले, ''कोणाला शहाणा म्हणावे आणि मूर्ख कोणाला म्हणावे?'' 
 
यावर दरबारी मंडळी एकमेकांकडे पाहू लागले. व चर्चा करू लागले. उत्तर मिळाले नाही म्हणून बादशहा भडकून बिरबलाला म्हणाला, ''बिरबल, तू दे बर माझ्या प्रश्नाचे उत्तर!''
यावर बिरबल म्हणाला, ''महाराज, जो माणूस मनात योजलेले बेत मेहनत, चिकाटी आणि योजना करून तडीस नेतो, तो शहाणा, आणि नुसतेच मोठमोठे बेत करून जो माणूस ते विसरून जातो किंवा योजलेली कामे तडीस नेण्यासाठी त्याची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेत सोडून देतो, तो मूर्ख.'' आता मात्र बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा समाधान पावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकादशी विशेष स्वादिष्ट उपवासाचा पराठा व ठेचा मखना रायता पाककृती