Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालकथा : मोठेपणा

Webdunia
एकेदिवशी काही कामकरी दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला. इतक्यात त्या खडकाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून मजुरांना फार आश्चर्य वाटले व ते त्याकडे कौतुकाने पाहात उभे राहिले. तो बेडूक त्या खडकाच्या पोटात जन्मला कसा, जगला कसा व वाढला कसा, यासंबंधी ते कामकरी आपसात बोलू लागले. त्यांची भाषणे कानी पडताच त्या बेडकालाही स्वत:बद्दल मोठी धन्यता व गर्व वाटू लागला. तो म्हणाला, दादांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला, तेव्हाच मीही जन्माला आलो. माझ्या बरोबरीचा म्हणवू शकेल असा एकही प्राणी या जगात नाही.  

भगवंताचे आणि माझे कूळ एकच आणि मीही पुढच्या प्रलयापर्यंत जगणार! तो बोलत आहे. इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, बेडूकदादा, तू पुष्कळ काळ जगलास आणि तुझा जन्म मोठय़ा कुळात झाला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखे काय आहे?  

आपल्या लांबलचक आयुष्याने कोणाचा काय फायदा होणार आहे. तीच माझी गोष्ट पाहा बरे? माझे आयुष्य मोठे नाही. तथापि मी सदोदित उद्योग करते व लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग मिळतो व सर्वानी कित्ता घेण्याजोगे माझे वर्तन असते. मोठय़ा कुळात जन्मून हजारो वर्षे जगले, परंतु सारे आयुष्य आळसात व अज्ञानात घालविले तर त्याचा काय उपयोग?

तात्पर्य : खरा मोठेपणा अंगच्या गुणावर व कर्तृत्वावर अवलंबून असतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

Independence Day Recipes 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष खास तिरंगा रेसिपीस

सकाळी भिजवलेले अंजीर खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; योग्य पद्धत जाणून घ्या

Income Tax Recruitment : आयकर विभागात १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ७ पदांची भरती संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

मेकअप काढताना या चुका अजिबात करू नका! त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पिकलेला फणस खाण्यापूर्वी ‘या’ लोकांनी घ्या विशेष काळजी! योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments