Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पेला होण्यापेक्षा तळं व्हावे

पेला होण्यापेक्षा तळं व्हावे
एकदा अनुभवी आणि वृद्ध गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्ट मीठ घेऊन परतला तेव्हा गुरुंनी त्या दु:खी तरुणाला त्यातील मूठभर मीठ एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगितले.
 
पाणी चवीला कसे लागले? गुरुंनी विचारले. कडू असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरुंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मूठभर मीठ त्या तळ्यात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळ्याजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळ्यात मिसळ्यानंतर ते वृद्ध गुरू म्हणाले, आता या तळ्यातील पाणी पिऊन पाहा. त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळ्यावर गुरुंनी त्याला विचारलं, आता या पाण्याची चव कशी आहे?
 
ताजी आणि मधुर! शिष्याने सांगितले. आता तुला मिठाची चव लागतेय? नाही.
 
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. ते म्हणाला, आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दु:खही तेवढंच असतं, परंतु आपण ते दु:ख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबून असतो. म्हणून जेव्हा आपण दु:खात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवले पाहिजे. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाय 'बी पी'ला ला नियंत्रणात करते वेलची