Dharma Sangrah

उपकार वाघासारख्यावर करावे

Webdunia
एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत येत नाही. इकडे पिलांना खूप भूक लागू लागते. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया येते. ती वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजते. तेव्हा पिलांच्या जीवात जीव येतो. 
 
आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागते. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करत असतानच तिथे वाघ आणि वाघीण परत येतात. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणतात, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश होता आणि तिला कृतज्ञतेने म्हणतो. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागते. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खाताना एका पक्ष बघतो आणि कुतूहलाने बकरीला त्याबद्दल विचारतो. बकरी त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगते. उपकाराचे महत्त्व पक्षाच्या लक्षात आल्यावर आपण पण असेच महान कार्य करायचे असं पक्षी ठरवतो. 
 
एकदा पक्षी उडत असताना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येत नाही कारण त्याचे पंख पिलांनी कुरतडलेले असतात. 
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
 
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी गंभीरपणे म्हणते "उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापुरते असून आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याया मिळाला की, सच्च्या व प्रामाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्यार्‍याला लक्षात ठेवतात".
सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खायचंय? बनवा ५ मिनिटांत 'मसाला कॉर्न'!

60th Birthday Wishes 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

50th Birthday Wishes ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सण-समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी; गुलकंद पासून बनवा अतिशय सोप्या आणि शाही रेसिपीज

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments