suvichar

बोधकथा : सद्‌गुणावर कर बसवावा

Webdunia
शनिवार, 14 जुलै 2018 (14:26 IST)
एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला,  'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्राणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धती ठरेना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजारवरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'
 
तात्पर्य : आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‌गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

2026 मधील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या! तुम्ही ही 3 कौशल्ये शिकल्यास, कंपन्या तुम्हाला ₹30 लाखांपर्यंतचे पॅकेज देतील!

डाळ-तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही; झटपट होणारे अत्यंत पौष्टिक नाचणीचे अप्पे

पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग आजच टाळा ह्या ६ गंभीर चुका; नाहीतर पडाल आजारी!

घरात कायम दुर्गंधी येते? हे सोपे उपाय करून पाहा

हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये PhD करा आणि मिळवा आकर्षक करिअर संधी

पुढील लेख
Show comments