suvichar

अती तेथे माती, जीवनाचे धडे देणारी गोष्ट

Webdunia
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (15:24 IST)
एक भिकारी होता. तो भिकारी रोज गावात फिरुन लोकांकडून भीक मागायचा. मिळेल ते खायचा, काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या कष्टाच्या जीवनाचा कंटाळा आला तेव्हा त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी जाऊन इंद्राची पूजा कर. ते प्रसन्न होऊन तुला श्रीमंत करतील. 
 
त्याने ऐकले आणि खरोखर इंद्र त्यावर प्रसन्न झाले. इंद्र म्हणाले की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात तो पर्यंत पैसे टाकेन जो पर्यंत तू स्वत: मला थांब म्हणत नाही. तू थांब म्हटलं की मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली आणि त्यातील पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तेव्हा भिकारी झोळी पुढे करुन मावेल एवढे पैसे घेतो आणि थांब म्हणतो. 
 
तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो गावात येतो. सुख-समाधानाने जगायला सुरुवात करतो.
 
तेव्हा कोणीतरी विचारतो की तू श्रीमंत कसा झालास ? तेव्हा तो सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जाऊन इंद्राला प्रसन्न करुन इंद्राकडून झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. 
 
 
तात्‍पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा म्हणून अती तेथे माती अशी म्हण आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

ठाणे महानगरपालिकेत 381 जागांसाठी महाभरती सुरू! ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Thank You Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार संदेश

Olympiad 2026: भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी! फिजिक्स, बायोलॉजी अन् केमिस्ट्रीत पटकावली पदके

High Protein Recipes for Kids मुलांसाठी ४ चविष्ट आणि उच्च प्रथिनयुक्त पाककृती

सकाळी लवकर उठायचे आहे? मग या प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा

पुढील लेख
Show comments