Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेनाली राम कथा : दूध न पिणारी मांजर

Tenali Ram Katha: A cat that does not drink milk kidsstories tenaliram stories in marathi
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)
दक्षिण भारतातील विजय नगर मध्ये राजा कृष्णदेव राय ह्यांचे राज्य होते. एकदा विजय नगर मध्ये उंदरांनी खूप उच्छाद मांडले होते. या मुळे संपूर्ण प्रजा वैतागली होती. कारण ते सगळ्यांचे नुकसान करायचे कोणाच्या शेतात नुकसान करायचे तर कोणाचे कपडे कुरतडून टाकायचे. सर्व प्रजा हैराण झाली होती ते सर्व एके दिवशी राजाकडे गेले आणि या वर काही उपाय सुचवायला सांगितले.  
 
प्रजेचे प्रमुख राजा ला म्हणाले की महाराज आम्हाला या उंदरांपासून सुटका मिळवून देण्याची काही युक्ती करा. प्रमुखाचे म्हणणे ऐकून राजाने आदेश दिले की प्रत्येक घरात एक मांजर पाळावी आणि त्यांची काळजी घ्यावी. त्यांनी प्रत्येक घरात एक-एक गाय देखील दिली. महाराजांनी तेनालीला देखील एक गाय आणि मांजर दिली.
 
मांजर आल्यावर उंदीर पळून गेले परंतु गायीचे दूध पिऊन पिऊन मांजरी जाड जाड झाल्या की त्यांना हलता येणे शक्य नहव्ते.तेनालीची मांजर देखील दूध पिऊन पिऊन जाड जुड  झाली होती. ती फार आळशी झाली. तिच्या आळशीपणा ला वैतागून तेनाली ने एक युक्ती काढली. त्याने  मांजरीच्या वाटीमध्ये गरम दूध ठेवले गरम दुधाला तोंड लावल्यावर लगेच मांजरीचे तोंड भाजले आणि तिने दुधाला तोंड लावले नाही.
अशा प्रकारे त्याची मांजर दुबळी झाली आणि इथे तिथे बागडू लागली राजाने सर्व मांजरीचे निरीक्षण करण्यासाठी मांजरींना दरबारात आणायला सांगितले. सगळ्यांच्या मांजरी जाड जुड झाल्या होत्या फक्त तेनालीची मांजर दुबळी होती. राजाने त्यांना त्याचे कारण विचारले त्यावर त्यांनी सांगितले की माझी मांजर दूध पीत नाही. सगळ्यांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा तेनालीने प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनाही दुधाची वाटी मांजरीचा समोर ठेवताच मांजर पळाली. हे बघून सर्वाना आश्चर्य झाला आणि तेनालीला ह्याचे कारण विचारले. तेव्हा तेनालीने घडलेले आणि केलेली युक्ती सांगितली अशा प्रकारे मांजर ने दूध  पिणे सोडले आणि स्वतःचे जेवण स्वतःच शोधायला जाऊ लागली. असं करत ती चपळ झाली. अशा प्रकारे मालकाने सेवकाशी वागावे त्याला आळशी होऊ देऊ नये. तेनालीच्या गोष्टीला ऐकून राजाने त्यांचे कौतुक केले आणि त्यांना स्वर्ण मुद्रा दिल्या.  
 
तात्पर्य - नेहमी परिश्रम करावे. आळशी बनू नये
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्नाला चविष्ट करण्यासाठी कुकिंग टिप्स