Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोध कथा : उपकार

The eagle story
, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (14:26 IST)
एक पक्षी पकडणारा असतो. एकदा तो चिमणीला पकडण्यासाठी जाळ लावतो. त्या जाळात थोड्याच वेळात एक गरूड अडकतो. तो गरूडाला घेऊन घरी येतो आणि त्याचे पंख कापतो. आता त्या गरूडाला उडता येत नाही तो घरात राहून तिथेच फिरायचा.
 
त्या पक्षी पकडणाऱ्याच्या घराच्या जवळ एक शिकारी राहत होता. त्याच्या कडून त्या गरूडाची दशा बघवली जात नव्हती तो त्या पक्षी पकडणाऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो 'मित्रा मला माहित आहे की आपल्याकडे एक गरूड आहे आणि आपण त्याचे पंख कापून टाकले आहे. गरूड एक शिकार करणारा पक्षी आहे लहान लहान प्राण्यांना खाऊन तो आपले पोट भरतो. या साठी त्याचे उडणे आवश्यक आहे. पण आपण त्याचे पंख कापून त्याला अधू बनवून टाकले आहे. तरी आपण त्याला मला विकणार का?
 
त्या पक्षी पकडणाऱ्यासाठी ते गरूड तर काहीच कामाचे न्हवते, म्हणून त्याने त्या शिकाऱ्याची गोष्ट ऐकून काही पैसे घेऊन ते गरूड विकले. शिकारी त्या गरूडाची सेवा करतो त्याला औषध देतो त्याचा व्यवस्थित सांभाळ करतो. दोन महिन्यातच गरूडाचे नवे पंख येतात आणि तो पुन्हा उडण्याच्या स्थितीत येतो.

आता शिकारी त्या गरूडाला आकाशात उडण्यासाठी सोडतो. गरूड उंच भरारी घेतो. शिकारी त्याला उडताना बघून खूप आनंदी होतो. गरूड देखील खूप आनंदी होतो आणि शिकारीसाठी खूप कृतज्ञ होतो. 
त्यासाठी तो शिकारी साठी एक ससा मारून आणतो. त्याला बघून एक कोल्हा गरूडाला म्हणतो की 'मित्रा जो माणूस तुला काही हानी देऊ शकत नाही त्याला सुख देऊन काय फायदा होणार?
त्यावर गरूड त्याला उत्तर देतो की 'प्रत्येकाला त्याचे उपकार मानले पाहिजे ज्यांनी त्यांची मदत केली आहे आणि अशांपासून सावध राहायला पाहिजे जे त्यांना हानी देऊ शकतात. 
 
तात्पर्य -प्रत्येकाला नेहमी मदत करणाऱ्याच्या प्रति कृतज्ञ असावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुधी भोपळ्याचे चविष्ट धिरडे