Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेनालीरामची कहाणी : तेनालीरामचा न्याय

tenaliram nyay
, शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (20:30 IST)
अनेक वर्षांपूर्वी कृष्णदेवराय दक्षिण भारतातील विजयनगर राज्यात राज्य करीत होते. त्यांच्या साम्राज्यात प्रत्येकजण आनंदी होता. नेहमी सम्राट कृष्णदेवराय प्रजेच्या हिताचा निर्णय घेतांना बुद्धिमान तेनालीरामची मदत घ्यायचे. तेनालीरामची बुद्धी एवढी हुशार होती की प्रत्येक समस्येचे समाधान त्यांच्याकडे असायचे. एकदा राजा कृष्णदेवरायांच्या दरबारात एक व्यक्ती रडत रडत आला. तो म्हणाला की, “महाराज मी नामदेव. जवळच्या हवेलीत काम करतो. माझ्या मालकाने माझ्यासोबत धोका केला आहे. माला न्याय पाहिजे. " राजा कृष्णदेवराय म्हणाले असे तुझ्यासोबत काय झाले. 
 
नामदेवने राजाला सांगितले की पाच दिवसांपूर्वी मी माझ्या मालकांसोबत हवेलीतुन पंचमुखी शिवजींच्या मंदिरात गेलो होतो. खूप जोर्यात वादळ आले. आम्ही दोघे मंदिराच्या एका भागात काही वेळेकरिता थांबलो. तेव्हाच माझी नजर एका मखमली लालरंगाच्या कपडयावर पडली. मी माझ्या मलकाकडून परवानगी घेऊन तो उचलला. पाहिले तर ती एक छोटी पुरचुंडी होती. ज्यात आतमध्ये हिरे होते. महाराज, ते हिरे मंदिराच्या मागच्या बाजूला पडलेले होते. मग माझे मालक म्हणाले की जर तू हे कोणाला सांगितले नाही तर आपण हे एकमेकांमध्ये वाटून घेऊ. माझ्या मनात पण लालच निर्माण झाले. याकरिता मी हो म्हंटले. हवेलित पोहचल्यावर मी माझा हीरा मागितला तर त्यांनी द्यायला नकार दिला. मी विचार केला होता की हीरा विकून मी नोकरी सोडेल व नविन काम सुरु करेल. कारण मालक माझ्याशी चांगले वागायचे नाही. तसेच नामदेव महाराजांना म्हणाला की मी दोन दिवस मालकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकून घेतले नाही व मला हीरा दयायला नकार दिला. आता तुम्हीच माझ्यासोबत न्याय करा. 
 
नामदेवाची कहाणी ऐकून राजाने सैनिक पाठवून त्याच्या मालकाला दरबारात बोलावून घेतले. महाराजांनी त्याची हिऱ्यांबदद्ल विचारपूस केली. तर तो मालक म्हणाला की हा माझा नौकर खोट बोलत आहे. हे खर आहे की त्या दिवशी मंदिराच्या मागे आम्हाला हीरे मिळाले होते. मी ते हीरे याला राजकोश पर्यंत पोहचवायला लावले होते. मग दोन दिवसानंतर मी याला हीरे जमा करण्याचा कागद मागितला. तर घाबरला आणि सरळ माझ्या घरुन निघून येथे आला. हा खोटी कहाणी सांगत आहे. मग राजा कृष्णदेवराय म्हणाले की तू हीरे कोणासमोर याला दिले होते का? मालकाने उत्तर दिले की मी माझ्या तीन नोकरांसमोर याला हिऱ्याची पुरचुंडी दिली होती. हे समजताच राजाने त्या तिघ नोकरांस बोलवले व नोकरांनी सांगितले की आमच्या समोर मालकाने नामदेवला हीरे दिले होते. नंतर दरबारातून निघाल्यावर राजा कृष्णदेवराय एकांतात चर्चा करत होते. सर्वात आधी राजा कॄष्णदेवराय म्हणाले की मला तर नामदेव खरा वाटतोय. मग मंत्री म्हणाले की आपण पुरावा असणाऱ्या त्या नोकरांना दुर्लक्षित करू शकत नाही. मग राजाने तेनलीरामला विचारले की तुला काय वाटते. तेनालीराम म्हणाले की मी खर आणि खोट माहित करून घेईल. फक्त तुम्हाला सर्वांना काही वेळ पडद्याच्या मागे बसावे लागेल. 
 
राजाने तेनालीरामचे म्हणणे ऐकून तसेच केले. दूसरे मंत्री पण राजाप्रमाणे तसेच पडद्यामागे बसले. आता तेनालीरामने साक्षीदाराला बोलवले आणि हीरे बद्दल विचारले. त्याने तेच पूर्वीचे उत्तर दिले. मग तेनालीराम म्हणाला की हीरे कसे दिसत होते. तू हिऱ्याचा आकर या कागदावर बनवू शकतोस. तो साक्षीदार म्हणाला की ते एका पुरचुंडी मध्ये होते. त्यामुळे माहीत नाही की ते कसे दिसायचे. तेनलीरामने पहिल्या साक्षीदारला तिथेच थांबवून दुसऱ्या साक्षीदाराला बोलवले. आणि तोच प्रश्न विचारला? दूसरा साक्षीदार म्हणाला की मी ते हीरे पाहिले मग त्यांनी काही वेगळे चित्र काढले. मग तेनालीरामने तिसऱ्या साक्षीदाराला बोलवले. आणि तोच प्रश्न विचारला? मग त्या तिसऱ्या साक्षीदाराने उत्तर दिले की, ते हीरे कागदात गुंडाळले होते. या करिता त्याने पाहिले नाही. पडद्याच्या मागे बसलेल्या राजाने या तीन साक्षीदारांचे बोलणे ऐकले. सर्वांनी दिलेल्या या वेगवेगळ्या उत्तरामुळे हे स्पष्ट दिसत होते की नामदेव खर बोलत आहे आणि त्याचा मालक खोट बोलत आहे. त्या तीन साक्षीदारांना पण लक्षात आले की आपले खोटे पकडले गेले आहे. सर्वांनी राजाचे पाय पकडून माफी मागितली व म्हणाले की आम्हाला आमच्या मालकाने खोट बोलण्यासाठी मजबूर केले होते. आम्ही जर असे केले नसते तर मालकाने आम्हाला नोकरीवरुन काढून टाकले असते. राजा कृष्णदेवराय आता दरबारात आले आणि मालकाला तुरंगात टाकून त्याच्या घरची चौकशी करण्याचे आदेश दिले. काही वेळातच सैनिकांना त्यांच्या घरात हीरे सापडले. मग महाराजांनी ते हीरे जप्त केलेत आणि महाराजांनी त्याला 30 हजार स्वर्ण मुद्रा राजकोषात जमा कराव्या  अशी शिक्षा दिली. त्यातील 10 हजार स्वर्ण मुद्रा नामदेवला दिल्यात. 
 
तात्पर्य:  
या कहाणीतून दोन उपदेश मिळतात. 1. कोणा सोबती ही कधीच धोका करू नये. कारण कोणाला धोका दिला तर त्याचे परिणाम वाईट होताता. 2. बुद्धीने प्रत्येकाचे खोटे पकडले जाऊ शकते.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेल एक्सटेंशन केल्यानंतर अशी घ्या काळजी