तेनालीराम जेव्हा पहिल्यांदा हंपी आले तेव्हा ते राजा कृष्णदेवराय यांना भेटू इच्छित होते. तसेच तेनालीराम आपल्या पत्नीला मंदिरात सोडून राजाला भेटण्यासाठी राजाच्या दरबारात गेले. जेव्हा ते राजाच्या महालाबाहेर पोहचले तेव्हा राजवाड्याच्या द्वारावर असलेल्या सैनिकाने त्यानं आत जाऊ दिले नाही.
तेनालीरामने सैनिकाला सांगितले की मला राजाला भेटायचे आहे कारण त्यांनी ऐकले आहे की राजा कृष्णदेवराय खूप दयाळू आणि उदार आहे. तसेच तेनालीरामने सांगितले ते फार लांबून महाराजांना भेटायला आले असल्याने राजा त्याला नक्कीच भेट देईल. हे ऐकून सैनिकाने तेनालीरामला विचारले की जर राजाकडून भेट मिळाली तर काय मिळेल? तेनालीने सैनिकाला वचन दिले की राजा त्याला जे काही देईल ते सैनिकासोबतवाटून घेईल. हे ऐकून सैनिकाने त्यांना राजवाड्यात जाण्याची परवानगी दिली.
तेनाली दरबारात प्रवेश करणार तेव्हा दुसऱ्या एका सैनिकाने त्यांना अडवले. तेनाली रामने त्याला सुद्धा वचन दिले की राजा जे काही भेटवस्तू देईल त्यातील अर्धा भाग ते सैनिकाला देतील. यावर दुसऱ्या सैनिकानेही तेनालीराम यांना आत जाऊ दिले.
तेनालीराम राजाच्या दरबारात गेले. तेव्हा त्यांनी राजाला पाहिले. तसेच त्यांना पाहून महाराज रागावले आणि त्यांनी सैनिकांना सांगून तेनालीराम यांना पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला. तेनालीरामने आपले हात जोडले आणि राजाला सांगितले की ज्या सैनिकांनी त्याला राजाच्या दरबारात प्रवेश करण्यास मदत केली होती त्यांना ही भेटवस्तू वाटून घ्यायची आहे. हे ऐकून राजाने दोन्ही सैनिकांना प्रत्येकी पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला.
आता तेनालीरामची हुशारी आणि बुद्धिमत्ता पाहून महाराज खूप प्रभावित झाले होते. महाराजांनी तेनालीरामला मौल्यवान वस्त्रे भेट दिली आणि त्यांना आपल्या राजदरबारात सहभागी केले.
Edited By- Dhanashri Naik