Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांजराच्या गळ्यात घंटा

Who will Bell the Cat
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (16:57 IST)
एका गावात एक दीनू नावाचा वाणी होता. त्याचे एक किराणा मालाचे दुकान होते. त्याच्या दुकानात खूप उंदीर राहायचे. अक्षरशः त्या उंदराने फार धमाकूळ घातले  होते. ते किराणा मालाची नासधूस करायचे. दीनू त्या उंदरांना वैतागला होता. त्याने विचार केला की हे उंदीर असेच धुडगूस करीत राहिले तर माझ्यावर दुकान बंद करण्याची पाळी येईल. काही तरी या उंदरांचा बंदोबस्त करायला हवा. असा तो विचार करू लागला. त्याला एक युक्ती सुचते. तो एक मांजर घेऊन येतो.
 
ती मांजर उंदीर दिसतातच पकडून खायची. अशा प्रकारे वाणी आरामशीर राहू लागला. इथे उंदराच्या गटात तणावाचे वातावरण तयार झाले. कारण मांजरीमुळे उंदरांची संख्या कमी होत होती. त्या उंदरांच्या गटातील प्रामुख्याने एक सभा बोलविली आणि या मांजरीचे काही तरी करावे असे सुचवू लागले. पण अखेर करावे तरी काय हीच चर्चा सुरू होती. 
 
बराच काळ लोटला पण निष्कर्ष काहीच निघेना. अखेर त्या गटामधील एक उंदीर म्हणाला की माझ्या कडे या साठीची एक युक्ती आहे. काय आहे सर्व जोरात ओरडले - तो उंदीर म्हणे की आपण या मांजरीच्या गळ्यात एक घंटी बांधायची. त्याने काय होणार सगळे म्हणाले त्यामुळे ती कुठे जाईल ते कळेल आणि आपण सावध होऊ शकू. 
 
अरे वा ! छान असे म्हणून सगळे आनंद साजरा करू लागले. पण त्यामधून एक वयस्कर उंदीर अचानक म्हणाला की अरे थांबा एवढा आनंद साजरा करू नका. 

त्याने सांगितलेली युक्ती छान आहे पण ..... पण काय आजोबा एक उंदीर म्हणाला पण त्या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार तरी कोण ? हे ऐकतातच सर्व निमूटपणे मान खाली घालून आपल्या बिळात शिरले. अजून एका युक्तीच्या शोधात.
 
बोध : वेळेला कामी येणारी युक्तीचं चांगली असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या गोष्टींमुळे जोडीदाराच्या मनामध्ये राग निर्माण होऊ शकतो