Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थोड्याशा मलाई पासून निघेल भरपूर तूप, फक्त या गोष्टी ठेवा लक्षात

What is the easy way to extract ghee
, गुरूवार, 13 जून 2024 (07:50 IST)
भारतीय स्वयंपाघरात तूप हे वापरले जाते. पोळी किंवा भाजी, वरण-भात, सर्वानवर तूप टाकतात. तूप फक्त चविष्टच नसते तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तर चला आज आम्ही तुम्हाला कमीतकमी मलाईपासून जास्तीतजास्त तूप कसे काढावे हे सांगणार आहोत. 
 
तूप करण्यापूर्वी या गोष्टींकडे ठेवावे लक्ष-
रात्रीच्या मलाईमध्ये दही घालावे. सकाळ पर्यंत मलाई पूर्णपणे जमून जाईल. आता तुम्ही तूप बनवण्यासाठी तयार आहात, अनेक महिला खूप मलाई अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवतात यामुळे तिला वास यायला लागतो तर असे न करता रात्रीच ताजी मलाई दही मध्ये मिक्स करावी. 
 
तसेच आता मदतीला बर्फ घ्यावा. बर्फाच्या मदतीने तुम्ही मलाईमधून खुपसारे तूप काढू शकाल. रात्री जमवलेल्या मलाईला मिक्सरमध्ये घालावे. त्यामध्ये बर्फाचे पाणी मिक्स करत जा. तुम्ही पाहाल की लोणी निघण्यास सुरवात होईल. या लोणीमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालावे. यामुळे लोणीचे प्रमाण वाढेल. ही टीप खासकरून उन्हाळ्यात महत्वाची आहे. 
 
आता लोणीला ताकापासून वेगळे करावे. आता लहान गॅस वर कढईमध्ये हे घालावे व अर्ध्या तासाकरिता ठेवावे तसेच मधूनमधून चमच्याने हलवत रहा. कलर थोडा बदलल्या नंतर गॅस वरून खाली काढावे. व चाळणीच्या मदतीने गाळून मग डब्यामध्ये भरावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सतत होते का तळपायांची जळजळ, अवलंबवा हे घरगुती उपाय