Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tasty Food जेवणाची चव वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Webdunia
स्वयंपाकाच्या छोट्या टिप्स उपयोगी पडतात. ते केवळ दररोजचे जेवण तयार करणे सोपे करत नाहीत. उलट ते कमी वेळात तयार होतात. काहीवेळा अन्न घाईत तयार केले जाते की त्याला चव नसते. पण जर तुम्ही या स्वयंपाकाच्या टिप्स फॉलो कराल. त्यामुळे पटकन तयार होणारे अन्नही अतिशय चविष्ट होण्यास तयार होईल. चला तर मग जाणून घेऊया अशा कुकिंग टिप्स.
 
1 वरणाला चविष्ट बनवा- 
दररोज तुरीची डाळ(वरण )कुटुंबातील सदस्यांना फिकट वाटत असेल.तर त्याची चव  वाढवण्यासाठी सर्वप्रथम डाळ शिजवा. नंतर कढईत जिरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडा गरम मसाला टाकून परतून घ्या. नंतर या फोडणी मध्ये मध्ये शिजवलेली तूर डाळ घाला. यामुळे वरणाची (डाळीची) चव दुप्पट होईल आणि सर्वांनाच आवडेल. 
 
2 मीठ जास्त झाल्यावर -
जर तुमच्या जेवणात मीठ जास्त असेल तर असू होऊ नये त्या साठी लक्षात ठेवा मीठ अन्न पूर्ण शिजल्यावर शेवटी घालायचे आहे. भाजी शिजल्यावर किंवा वरण शिजल्यावर शेवटी मीठ टाकल्यास अन्नात मीठ जास्त होत नाही आणि चवही वाढते.
 
3 चविष्ट आरोग्यदायी खीर बनवा -
खीर शिजल्यावर त्यात साखर टाकली जाते.पण काही लोकांना मधुमेह असल्यामुळे त्यांना खिरीची चव घेता येत नाही. तर खीर गोड करण्यासाठी साखरेऐवजी गूळाचा वापर करा. यामुळे खीरीची चवही वाढेल आणि ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. त्यामुळे जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर गुळाची खीर बनवा आणि सर्व्ह करा. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
 
4 बेसन संपल्यावर हे करा -
घरातील बेसन संपले आणि पकोडे बनवायचे असतील तर बाजारात धावण्याची गरज नाही. घरी ठेवलेल्या हरभऱ्याची डाळ ग्राइंडरमध्ये बारीक करून पीठ लवकर तयार करता येते. आणि वेळ असल्यास हरभरा डाळ अर्धा तास भिजत घालावी. नंतर त्यांना बारीक करून खमंग पकोडे बनवा. आणि त्याचा आस्वाद घ्या. 
 
या छोट्या कुकिंग टिप्सच्या मदतीने तुमचे स्वयंपाकघर देखील रुचकर होईल. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

पुढील लेख
Show comments