Festival Posters
✕

Cooking Tips :चपाती मऊ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (22:31 IST)
प्रत्येक घरात चपातीचा वापर केला जातो. हा फक्त लंच आणि डिनरचा एक महत्त्वाचा भाग नाही, तर बर्‍याच लोकांना नाश्त्यातही ते खायला आवडते. बर्‍याच वेळा आपण चपाती किंवा पोळ्या  बनवतो, त्यावेळी ती मऊ असते, पण लवकरच ती कडक होते. अशा स्थितीत ते पुन्हा खावेसे वाटत नाही. तथापि, जर तुम्हाला तुमच्या रोट्या जास्त काळ मऊ ठेवायच्या असतील तर तुम्ही काही छोट्या टिप्सचा अवलंब करा.
 
पिठात तेल घाला -
जर पोळ्या जास्त काळ मऊ ठेवायच्या असतील तर पीठ मळताना गव्हाच्या पिठात थोडे तेल घालावे. कणिक मळताना तेल घातल्यास चपात्या तव्यावर लवकर शिजण्यास मदत होईल. अशा परिस्थितीत पोळ्या बराच काळ मऊ राहतात.
 
दूध वापरा-
दूध वापरल्याने पोळ्यां दीर्घकाळ मऊ राहण्यास मदत होते.बाहेर कुठे जात असाल आणि पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवायच्या असतील तर पाण्याऐवजी पीठ दुधाने मळून घ्या. दुधामुळे पीठ मऊ होते आणि पोळ्या जास्त काळ मऊ राहतात.
 
मऊ पीठ  -
पोळ्या कश्या बनतील हे सर्व काही मळलेल्या कणिक वर अवलंबून असते. अनेक वेळा आपण घाईघाईने पीठ मळून घेतो आणि तुलनेने कमी पाणी घालतो. असे केल्याने पीठ घट्ट होते आणि नंतर पोळ्या देखील जास्त काळ मऊ राहत नाहीत. मऊ आणि गुळगुळीत पीठ मळून घेण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालावे. तथापि, जास्त पाणी घालू नये याची काळजी घ्या कारण यामुळे रोल केलेल्या रोट्या तुटू शकतात. तसेच, किमान 10-15 मिनिटे मळून घ्या आणि पोळ्या बनवण्यापूर्वी थोडा वेळ राहू द्या.
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments