Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या जास्त दिवस टिकवायच्या? वापरा हा सोपा उपाय

Webdunia
शुक्रवार, 13 मार्च 2026 (15:48 IST)
फ्रिजमध्ये भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही योग्य पद्धतीने साठवणूक केली, तर भाज्यांचा कोमेजण्याचा वेग नक्कीच कमी होतो.
ALSO READ: टिफिनमध्ये पोळ्या ओल्या होतात का? अशा प्रकारे पॅक करा; तासांनंतरही फ्रेश राहतील<>

१. भाज्या कोरड्या ठेवा

भाज्यांमध्ये ओलावा किंवा पाणी असेल तर त्या लवकर सडतात.
बाजारातून भाज्या आणल्यानंतर त्या धुवून घेणार असाल, तर त्या पूर्णपणे कोरड्या करूनच फ्रिजमध्ये ठेवा.
पालेभाज्या (मेथी, कोथिंबीर) कधीही धुवून फ्रिजमध्ये ठेवू नका. त्या निवडल्यानंतर कागदात गुंडाळून ठेवा.

२. टिशू पेपर किंवा सुती कापडाचा वापर

भाज्यांच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये एक टिशू पेपर ठेवा. हा पेपर भाज्यांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे भाज्या सडत नाहीत.
हिरव्या मिरच्यांचा देठ काढून त्या टिशू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवल्यास त्या २०-२५ दिवस चांगल्या राहतात.

३. हवा बंद डबे

काकडी, गाजर, सिमला मिरची यांसारख्या भाज्या हवाबंद डब्यात ठेवल्यास त्या जास्त दिवस कुरकुरीत राहतात.
कोथिंबीर निवडल्यानंतर एका स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात खाली आणि वर टिशू पेपर लावून ठेवा. ती २ आठवडे ताजी राहते.

४. पालेभाज्यांसाठी 'वर्तमानपत्र' नको

अनेकजण भाज्या पेपरमध्ये गुंडाळतात, पण वर्तमानपत्राची शाई आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्याऐवजी पांढरा कागद किंवा सुती कापडी पिशव्या वापरा.

५. विशिष्ट भाज्यांची काळजी

लिंबू: लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांना थोडे खोबरेल तेल लावून हवाबंद डब्यात ठेवा.
आलं: आलं माती काढून कोरडं करून एका कागदी पिशवीत ठेवा.
कढीपत्ता: कढीपत्त्याची पाने डहाळीपासून वेगळी करून, धुवून, वाळवून डब्यात भरून ठेवा.

खास टीप-

फळे आणि भाज्या कधीही एकत्र ठेवू नका. काही फळांमधून (उदा. सफरचंद) 'इथिलीन' नावाचा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे शेजारी ठेवलेल्या भाज्या लवकर पिकून खराब होऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: भाजीला हॉटेलसारखी रिच ग्रेव्ही आणि चव देण्यासाठी काही खास 'किचन सीक्रेट्स'
Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

श्रावण महिन्यात उपवास करत असाल, तर ही तीन योगासने करायला विसरू नका

पौराणिक कथा : अशाप्रकारे हनुमानजी आकाशात उडायला शिकले

महिलांनी दरवर्षी कराव्यात या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या; गंभीर आजारांपासून राहाल एक पाऊल पुढे

Hoonemoon Phase लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही 'हनीमून फेज' टिकू शकते का? न्यूरोसायन्सने दिले उत्तर!

Latte Makeup Look फाउंडेशनच्या जाड थराशिवाय मिळवा ग्लोइंग फेस !

पुढील लेख
Show comments