Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तळल्यानंतर कढईत उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करण्यासाठी या टिप्स अमलात आणा, आरोग्यास हानी पोहोचणार नाही

तळल्यानंतर कढईत उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करण्यासाठी या टिप्स अमलात आणा, आरोग्यास हानी पोहोचणार नाही
, सोमवार, 5 जुलै 2021 (15:24 IST)
घरात पावसाळी हंगाम असो वा इतर कुठलंही सण-वार, फंक्शनस असो, बहुतेक घरात पुरी-भजी नक्कीच बनवलं जातं. तळकट पदार्थ खाणं प्रत्येकाची आवड असते परंतु ती बनवल्यानंतर बर्‍याचदा अडचण असते की पॅनमध्ये राहिलेल्या तेलाचे काय करावे. तज्ज्ञांच्या मते खाद्यतेलचा पुनर्वापर टाळावा. असे केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते. जर आपल्यालाही त्याच भीतीचा सामना करावा लागला असेल आणि स्वयंपाकासाठी आधीपासून वापरलेले तेल वापरू इच्छित नसाल तर हे तेल फेकण्याऐवजी या टिपांचे अनुसरण करा.
 
कढईत उर्वरित तेल वापरण्यासाठी या टिपा अनुसरण करा-
एकदा तळल्यानंतर, पुन्हा तेच तेल वापरण्यासारखे वाटत नसेल तर आपण घरगुती इतर कामांसाठी ते सहजपणे वापरू शकता. चला कसे ते जाणून घेऊया-
 
दरवाजाच्या हुक आणि कीळ यांच्यावर हे तेल लावा. असे केल्याने ते गंजत नाहीत आणि आवाजही थांबतं.
वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करण्यासाठी, आपण ते फिल्टर करू शकता आणि मुलांच्या क्राफ्ट्समध्ये इत्यादी वापरू शकता.
जर तुम्ही स्वयंपाकासाठी मोहरीचे तेल वापरत असाल तर आपण दिवा वापरण्यासाठी हे तेल वापरू शकता.
हे काही लोकांनाच माहित असेल की आपण बागकामसाठी स्वयंपाकघरातील तेल देखील वापरू शकता. यासाठी, ज्या झाडांजवळ जास्त कीटक येत असतील तेथे एका वाटीत हे तेल ठेवून द्यावं. असे केल्याने कीटक आणि कोळी तेलाच्या भांड्याजवळ येतील आणि झाडाला इजा पोहोचवू शकणार नाहीत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाफ्याच्या झाडा