पावसाळ्यात सिंकच्या आजूबाजूला शेवाळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. तसेच स्वछता न ठेवल्यास या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. सिंकला लागले शेवाळ काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सोप्प्या पद्धतीने सिंक स्वच्छ करू शकाल.
घरगुती उपाय-
सिंक वर गरम पाणी घालून स्वच्छ करावे.
शेवाळ असलेल्या भागावर बाथरूम क्लीनर टाकावे.
तसेच ब्रशने चांगल्या प्रकारे पसरवून काही वेळ तसेच ठेवावे. मग स्वच्छ करावे.
लिंबू आणि मीठ-
लिंबाला दोन तुकड्यांमध्ये कापून त्यावर मीठ घालावे व शेवाळ असेल त्याठिकाणी घासावे.
15 मिनिटानंतर एका ब्रश ने किंवा स्पॉन्ज न स्वच्छ करावे.
कास्टिक सोडा आणि डिश वाशिंग लिक्विड-
कास्टिक सोडा अंडी डिश वाशिंग लिक्विड एकत्रित करून पेस्ट बनवावी.
या पेस्टला शेवाळ असलेल्या ठिकाणी लावून ठेवावे.
ब्रशने स्क्रब करा आणि गरम पाण्याने धुवून घ्या.
शेवाळ जमा होऊ नये म्हणून रात्री सिंकच्या आजूबाजूला गरम पाणी टाकून घासून घ्यावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik