Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा

If you have too much salt in your vegetables
, गुरूवार, 5 मे 2022 (08:34 IST)
असं म्हणतात की मीठ असते तेव्हा कोणाचे त्याकडे लक्ष नसते. परंतु भाजीत किंवा वरणात नसल्यावर त्याची आठवण येते.भाजीत मीठ जास्त पडल्यावर कोणालाही ती भाजी खावीशी वाटत नाही. भाजीत मीठ जास्त झाले असल्यास काय करावं? आपण भाजी पुन्हा बनवू शकत नाही. भाजीत मीठ जास्त झाल्यास काय करावे चला जाणून घ्या.  
 
1 जर कोरड्या भाजीत जास्त मीठ झाले तर आपण थोडं हरभरा डाळी चे पीठ भाजून भाजीत घाला. थोड्या वेळात, भाजीची चव देखील ठीक होईल आणि ती अधिक चवदार लागेल.
 
2 रसदार भाजीत मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून उकळवून घ्या. उशीर होत असेल तर भाजीत कणकेच्या गोळ्या घालू शकता. या मुळे मीठ कमी होईल.
 
3 बऱ्याच हिवाळा चायनीज फूड मध्ये मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडस लिंबाचा रस मिसळा.अन्नातून मीठ कमी होईल आणि चव चांगली राहील.
 
4 बऱ्याच वेळा रसदार भाजीत उकडलेला बटाटा देखील घालू शकता. ऐकण्यात विचित्र वाटत असेल तरी हे प्रभावी आहे. या मुळे भाजीतील किंवा वरणातील मीठ कमी होईल 
 
5 अन्न सर्व्ह करताना शेवटच्या क्षणी कळते की भाजीत मीठ जास्त झाले आहे या साठी आपण भाजीत ब्रेडचा तुकडा घाला आणि सर्व्ह करताना हळूच काढून घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलिंगडाचे बियाणे हृदय आणि मन तंदुरुस्त ठेवण्यात फायदेशीर