Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अशी तयारी असेल तर स्वयंपाक करायला फारसा वेळ लागत नाही

अशी तयारी असेल तर स्वयंपाक करायला फारसा वेळ लागत नाही
, गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:49 IST)
कोशिंबिरीसाठी लागणारे गाजर, बीट, कोबी, मुळा वगैरे मोकळ्या वेळात एकदाच २-३ दिवसाला पुरेल एवढे किसून फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे म्हणजे त्यातील जीवनसत्त्वेही तसेच राहतात व घाईच्या वेळेत पटकन पाहिजे तेवढी कोशिंबीर करून घेता येईल.
 
पालेभाज्या आदल्या दिवशी साफ करून ठेवाव्यात म्हणजे, आयत्या वेळी धुऊन व चिरून चटकन भाजी करत येईल.
 
आठवड्याला लागणारा नारळ एकदाच किसून फ्रीजमध्ये ठेवावा.
 
भाजलेल्या कांदा-खोबऱ्याचे वाटण एकदाच जास्तीच करून त्यात थोडे मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास १०-१५ दिवस चांगले राहू शकतो.
 
पोळीची कणीक मळूनही फ्रीजमध्ये ठेवल्यास आयत्या वेळी झटपट पोळ्या करता येतील.
 
पराठे करण्यासाठी गाजर, बीट, मुळा, कोबी किसून तो थोडा परतून घ्यावा व त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट व मीठ, लिंबू, साखर घालून परतून कोरडा करावा व हा अर्धवट कच्चा कीस डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. हा कीस ८-१० दिवस चांगला राहतो व मुलांना पाहिजे तेव्हा पोळीच्या पिठात भरून झटपट पौष्टिक पराठे करून देता येतील.
 
भाज्या झटपट होण्यासाठी छोटा २-३ लीटरच कुकर वापरावा. गवार, घेवडा, तोंडलीसारख्या सुक्या भाज्या करण्यासाठी भाजी कुकरामध्येच फोडणीला द्यावी व त्यात मीठ, गूळ, खोबरे घालून अर्धी वाटी पाणी घुणा कुकराला २ शिट्या काढाव्यात. अगदी ५ मिनिटांतच छान भाजी तयार होते. रस भाजी व उसळी करण्यासाठी बेताचे पाणी घालावे व ३ शिट्या काढाव्यात. (शिट्या जास्त काढल्यास भाजी जास्त शिजून कुस्करेल.) प्रेशर कुकरच्या वापरामुळे इंधन व वेळ दोन्हीची बचत होते.
 
डोसे व उत्तप्पाचे जास्तीचे पीठ करून २-३ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो व आयत्या वेळी डोसे व उत्तपे करू शकतो.
 
कोणत्याही भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात. भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील जीवनसत्त्वे पाण्यातून निघून जातील.
 
रवा उन्हात वाळवून किंवा कोरडाच भाजून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. १-२ महिने चांगला राहील. अळ्या पडणार नाहीत व घाईगडबडीत रवा निवडण्याचा वेळ वाचेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benefits of Flax Seeds आरोग्य आणि सौंदर्यसाठी अत्यंत फायदेशीर