Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kitchen Hacks : घरी लसूण पावडर कशी बनवायची, जाणून घ्या...

Webdunia
गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (17:40 IST)
लसूण पावडर : व्हेज डिश असो की नॉनव्हेज डिश, लसणाशिवाय दोन्हीची चव थोडी अपूर्ण राहते. लसूण केवळ भाजीची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. लसूण पेस्ट पावडरपेक्षा लवकर खराब होते. अशा परिस्थितीत आपण लसूण पावडर घरी सहजपणे कशी बनवू शकता आणि ती साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया. 
 
लसूण पावडर बनवण्याची पहिली पद्धत- लसूण पावडर बनवण्यासाठी प्रथम 500-600 ग्रॅम लसूण घ्या आणि ते चांगले सोलून घ्या. यानंतर अर्धा कप पाण्यात मिक्सरमध्ये लसणाच्या कळ्या टाका आणि पेस्ट बनवा आणि एका भांड्यात ठेवा. आता एक सुती कापड उन्हात ठेवून त्यावर लसणाची पेस्ट लहान आकारात टाकून साधारण २-३ दिवस सुकायला सोडा. लसूण पेस्ट चांगली सुकल्यावर पुन्हा मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवा.
 
लसूण पावडर बनवण्याची दुसरी पद्धत- लसूण पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, त्याची साले लसणापासून वेगळी करून, अर्धा कप पाण्यात मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एका भांड्यात ठेवा आणि मायक्रोवेव्ह करून चांगली कोरडी करा. यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवा.
कसे साठवायचे-
तुम्ही घरी बनवलेले लसूण पावडर अनेक दिवस सहज साठवू शकता. लसूण पावडर साठवण्यासाठी, तुम्ही फक्त काचेचे भांडे किंवा हवाबंद कंटेनर घ्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा

पौष्टिक पालक डोसा रेसिपी

पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये करिअर करा

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय अवलंबवा

चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर

पुढील लेख
Show comments