Dharma Sangrah
✕

Kitchen Tips: अरबी सोलताना हाताला खाज येते, हे उपाय अवलंबवा

Webdunia
सोमवार, 6 जून 2022 (23:38 IST)
Easy Arbi Vegetable Peeling Tips: भारतात अरबीचे शौकीन असलेल्या लोकांची कमतरता नाही, कारण ही भाजी जितकी चविष्ट आहे तितकीच ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण अरबीची सर्वात मोठी समस्या ही आहे की अरबीची भाजी सोलणे इतके सोपे नाही कारण हे करताना हातांना खाज सुटणे आणि सूज येते. त्याची साल खूप पातळ असते, त्यामुळे हात न लावता अरबी बारीक सोलणे अवघड असते. हे काही उपाय अवलंबवून आपण अरबी सोलताना होणारी खाज टाळू शकता. 
 
1 स्वयंपाक घरातील हातमोजे घाला-
अरबी सोलताना हाताला खाज येऊ नये असे वाटत असेल तर पहिली अट अशी आहे की हे काम सुरू करण्यापूर्वी स्वयंपाकघरातील हातमोजे घाला आणि मग ही भाजी सोलण्याचा विचार करा.
 
2. डिश वॉश स्क्रब वापरा-
हातमोजे घातल्यानंतर अरबी सोलणे सोपे नाही, अशा परिस्थितीत भांडी धुण्यासाठी स्क्रबचा वापर करू शकता, कारण त्याच्या मदतीने हे काम अगदी सहजपणे पूर्ण होईल. लक्षात ठेवा की स्क्रब नवीन आहे आणि ते भांडी धुण्यासाठी किंवा इतर कोणत्याही साफसफाईच्या कामासाठी वापरलेले नसावे.
 
3. नारळाची साल वापरा-
जर तुम्हाला भांडी धुण्यासाठी स्क्रब वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही नारळाची साल वापरू शकता. यासाठी नारळाच्या सालीला बॉलच्या आकारात बनवा आणि नंतर अरबीची साल काढून घ्या.
 
4. हाताला तेल लावा.-
जर तुम्हाला किचन ग्लोव्हज वापरणे सोयीचे नसेल तर त्याऐवजी हाताला थोडे तेल लावा, पण हे करण्यापूर्वी हात पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे, नंतर अरबीवर मीठ शिंपडा आणि नंतर साल काढून घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments