Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Kasuri Methi घरी सोप्या पद्धतीने तयार करा कसूरी मेथी

Kasuri Methi घरी सोप्या पद्धतीने तयार करा कसूरी मेथी
Kasuri Methi Recipe हिवाळ्यात उपलब्ध असलेली हिरवीगार मेथी खायला सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की कसुरी मेथी फक्त हिरव्या मेथीपासून बनवली जाते. ज्याचा वापर आपण वर्षभर कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो. होय हिरवी मेथी वाळवून कसुरी मेथी बनवली जाते. मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. मेथीपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. तर चला जाणून घेऊया कसुरी मेथी बनवण्याची सोपी पद्धत.
 
कसूरी मेथीचे फायदे
ताजी आणि वाळलेली मेथीची पाने अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जातात. हे अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने, लोह, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचन सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत होते. इतकंच नाही तर मधुमेहामध्येही मेथी खूप फायदेशीर मानली जाते.
 
कसूरी मेथी तयार करण्याची सोपी पद्दत-
कसूरी मेथी बनवण्यासाठी हिरव्या मेथीच्या पानांचे देठ काढून टाका आणि निवडलेली मेथी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. पाणी निथारुन चालणी किंवा जाड कॉटन कापडावर वाळवून घ्या. आपण पाने पेपरवर पसरवून पंख्याखाली वाळवून घेऊ शकता. त्यातील ओलावा पूर्णपणे वाळू द्या. नंतर मेथी उन्हात वाळवून घ्या. मात्र आपल्याला मेथी लवकर वाळवायची असेल तर पाने तीन ते चार मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये देखील ठेवू शकता. चांगली वाळल्यावर कोरड्या ठिकाणी एअर टाइट कंटनेरमध्ये स्टोअर करुन ठेवा. या प्रकारे तयार केलेली मेथी वर्षभर टिकेल आणि सुंगध ही देईल.
 
आपण ही मेथी कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी करु शकता. आपण कसूरी मेथीचा वापर वर्षभर पराठे आणि ग्रेव्हीसह इतर पदार्थांमध्ये देखील करु शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Railway Recruitment 2023: रेल्वेत 12 वी उत्तीर्णांना नौकरीची सुवर्ण संधी, तपशील जाणून घ्या