गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे. घरोघरी आनंदोत्सव होणार आहे. 10 दिवस या सणाची लगभग असते. घरात उत्साह आणि आनंदच वातावरण असते. घरोघरी लाडक्या बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीचे मोदक घरोघरी गणेशोत्सवात आवर्जून बनतात. बाजारात मिळणारे उकडीचे मोदक असो किंवा घरात साच्याने बनवले जाणारे उकडीचे मोदक असो मोदकाला पाकळ्या किंवा कळ्या चांगल्या पडल्यावर ते दिसायलाच छान दिसतात. पण सर्वानाच मोदकांच्या पाकळ्या करण जमेल असे नाही. पाकळ्या करताना मोदकाची पारी फाटते किंवा त्याचा आकार चांगला येत नाही. मोदकाच्या पाकळ्या किंवा कळ्या चांगल्या बनवण्यासाठी या काही टिप्स आहे त्या अवलंबवा जेणे करून उकडीच्या मोदकाच्या पाकळ्या चांगल्या पडतील.चला तर मग जाणून घेऊ या.
1 उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा घेऊन त्याला चांगले मळून घ्या. नंतर त्याला पीठ लावून त्याला पुरी प्रमाणे लाटा.
2 तयार पुरीमध्ये गुळ, खोबरे, ड्रायफ्रूट्स व माव्याचे मिश्रण भरून सारणाचा गोळा व्यवस्थितरित्या पुरीवर ठेवून घ्या.
3. हातांच्या बोटाला तेल लावून घ्या. हातावर ही लाटलेली पुरी घेऊन दोन बोटांच्या मधोमध पुरी पकडून त्याला हळूहळू बोटांच्या साहाय्याने फिरवा व कळ्या पाडून घ्या.
4 कळ्या पाडताना सारणाला अंगळ्याच्या साहाय्याने पकडून ठेवा व अलगद हाताने ह्या कळ्या पाडत जा.
5 कळ्या पाडून झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगद त्याला गोलगोल फिरवा.हात फिरवताना कळ्या दुमडल्या जाणार नाही याची काळजी घ्या.
6 मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना चमच्याच्या खालचे टोक फिरवून घ्या. त्यानंतर चाळणीवर किंवा मोदक पात्रात हे मोदक ठेवून 15 मिनिट ते वाफवून घ्या. वरुन साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य ठेवा.