Daily Horoscope
✕

आलं-लसूण पेस्ट महिनाभर काय अगदी दोन महिने खराब होणार नाही; जाणून घ्या साठवणुकीच्या टिप्स

वेबदुनिया फीचर टीम
शुक्रवार, 15 मे 2026 (16:57 IST)
आलं-लसूण आलं-लसूण पेस्टघरी बनवताना ती महिनाभर काय, अगदी दोन महिने सुद्धा फ्रेश आणि हिरवट न पडता टिकवून ठेवण्यासाठी या साध्या गोष्टी लक्षात ठेवा

पाणी अजिबात वापरू नका
पेस्ट वाटताना चुकूनही पाण्याचा वापर करू नका. पाणी घातल्यामुळे पेस्टला लवकर बुरशी येते किंवा ती आंबट होते.

नैसर्गिक संरक्षक
पेस्ट वाटताना त्यात खालील दोन गोष्टी आवर्जून टाका:
मीठ: मीठ हे नैसर्गिक संरक्षक (Preservative) म्हणून काम करते.
खाद्यतेल: वाटताना १ ते २ मोठे चमचे तेल वापरा. तेलामुळे पेस्टचा पोत (Texture) मऊ राहतो आणि ती ऑक्सिडाइझ होऊन काळी किंवा हिरवी पडत नाही.

हळदीचा वापर
जर तुम्हाला पेस्टचा रंग एकदम छान पिवळसर आणि फ्रेश हवा असेल, तर त्यात पाव चमचा हळद टाका. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पेस्टला खराब होऊ देत नाहीत.

साठवण्याची योग्य पद्धत
काचेची बरणी: पेस्ट नेहमी काचेच्या हवाबंद (Air-tight) बरणीत भरा. प्लास्टिकच्या डब्यात वास साचून राहतो.
ओला चमचा टाळा: पेस्ट काढताना नेहमी कोरड्या चमच्याचाच वापर करा.
आलं-लसूण पेस्ट बनवण्याचे योग्य प्रमाण:
साधारणपणे ६०% लसूण आणि ४०% आलं असे प्रमाण ठेवावे. आल्याचे प्रमाण जास्त झाले तर पेस्ट थोडी कडवट लागू शकते.
ALSO READ: उन्हाळ्यात शिजवलेली डाळ लवकर खराब होते, ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स
कृती-
१. आलं आणि लसूण सोलून पूर्णपणे कोरडे करून घ्या.
२. मिक्सरच्या भांड्यात आलं-लसूण, थोडे मीठ, हळद आणि तेल टाका.
३. पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: किचन टिप्स : वाळलेली कोथिंबीर फेकू नका तर या प्रकारे करा उपयोग
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

पुढील लेख
Show comments