Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

स्मार्ट किचन टिप्स

स्मार्ट किचन टिप्स
, मंगळवार, 11 मे 2021 (22:29 IST)
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल. 
 
* उष्टी भांडी लगेच स्वच्छ करून जागेवर ठेवा. उष्ट्या भांडयात जिवाणू होऊ लागतात ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 
 
* स्वयंपाकघराची लादी दररोज पुसून काढा. जेणे करून स्वयंपाकघरात कीटक होणार नाही. 
 
* स्वयंपाक करताना जिन्नस बघून घ्या त्यात कीटक तर नाही. 
 
* स्वयंपाकघरातील कपाट थोड्या-थोड्या दिवसात स्वच्छ करावे. 
 
* स्वयंपाकघर महिन्यातून एकदा तरी धुवून काढा या साठी आपण कोणते ही क्लिंजिंग उत्पाद वापरू शकता. 
 
* स्वयंपाकघरातील डबे वेग वेगळे ठेवा जसे की काही काचे चे काही स्टील चे तर काही डबे प्लास्टिक चे. 
 
* प्रत्येक वेळी सामान भरण्यापूर्वी डबे घासून घ्या जेणे करून त्यात काही घाण असल्यास सामान खराब होऊ शकत. 
 
* स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी नेहमी कॉटन चा रुमाल ठेवा. 
 
* स्वयंपाकघरातील वापरणाऱ्या रुमाल किंवा टॉवेल ला दर तिसऱ्या दिवशी धुवावे. 
 
* किचन टॉवेल वरील डाग काढण्यासाठी आपण ते उकळत्या पाण्यात भिजवून ठेवा या मुळे सर्व डाग नाही से होतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा