बटाटे उकळण्यासाठी किमान 10 ते 15 मिनटे लागतात. जर आपल्याला बटाटे लवकर उकळवायचे असल्यास बटाटे लवकर उकळण्यासाठी काही टिप्स अवलंबवा.
* बटाटे चिरून उकळवा- बटाटे मधून कापून उकळवायला ठेवा .बटाट्यात मीठ घालून ठेवल्याने ते मधून फाटत नाही.
* बटाटे सोलून उकळवा- बटाटे धुवून सोलून सुरीने छिद्र पाडून उकळवायला ठेवा. असं केल्याने बटाटे लवकर उकळतात.
* गरम पाण्यात भिजवून उकळवा- सालासह बटाटे उकळवायचे असेल तर 2 -3 मिनिट गरम पाण्यात बटाटे घालून ठेवा आणि त्यात 1 चमचा मीठ देखील घाला. नंतर सुरीने किंवा काट्याने छिद्र करा. कुकर मध्ये बटाटे ठेवा. बटाटे लवकर उकळतात.