Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भ्रमात असणं पण कधी कधी चांगलं असतं

love poem
, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (23:38 IST)
भ्रमात असणं पण कधी कधी चांगलं असतं,
नसतं ते मनाला लावून घेतल्या जात नसत,
हलक असतं माणूस, खोलात जात नाही,
नसत्या गोष्टींच्या विचारात सहसा पडत नाही,
जे आहे त्यास च सत्य मानतो, अन उगी बसतो,
आपल्या च दुनियेत नेहमी मशगुल असतो,
पण एकदा का भोपळा भ्रमाचा फुटला  ,
सत्यात येऊनच तो मात्र पार लटपटला,
आपण ज्यास मानत होतो नितांत सुंदर,
ते आपल्या करीता नव्हेच, ह्याचा हा प्रत्यंतर,
मग येऊ लागते हळूहळू जाग, अन वास्तवते शी सामना,
चित्रं स्पष्ट होऊ लागते, स्पष्ट होते कल्पना!
सावराव लागत स्वतःला हेलपटण्या पासून,
पुन्हा उभं राहायचं असतं मजबूत पाय रोवून!!
....अश्विनी थत्ते 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LDC, चालक, शिपाई, स्टेनोसह 40 पदांसाठी भरती