प्रेम कसं असावं कसं दिसावं,
प्रत्येकानं आपापलं ते अनुभवावं,
कांहींच न बोलता फुलत जातं,
काहींचं भांडत भांडत बहरत जातं,
काहींच नजरेच्या कोपऱ्यातून बघत,
तर काहींच जीवापाड एकमेकांना जपत,
काहींच्या आणाभाका असतात खूप,
काहींच आपलं आपलं सगळंच असत चूप,
पण जे आहे ते खूपच निर्मळ असावं,
फसवेपणा ला कुठंच थारा त्यात नसावं,
देऊन टाकणे हेंच सदा आचरणात आणावं,
काही घेऊन कुणाचं भल नसतं हेच जाणाव,
अशी ही प्रेमनगरी आगळी वेगळी असते,
हे ही खरंय की ती सगळ्यांच्या नशीबी ही नसते!!
...अश्विनी थत्ते.