Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहारा मी होईल तुझा असा

love poem
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:06 IST)
सहारा मी होईल तुझा असा,
कुठं न डगमगणारा भरवसा,
असोत मार्गी खाच खळगे किती,
माझ्या सवे तुज कशाची ग भीती?
असा क्षण नाही येणार जिथं तू एकटी,
मनोधैर्य वाढविन तुझे,रक्षीन तुज संकटी,
कोण मी तुझा, अन तू माझी काय?
प्रश हे जनास पडतील, आपल्यास त्याचे काय?
नकोस जाऊ गोंधळून प्रिये, हो निर्धास्त,
तुझ्यावरील प्रेमाचा कधी न होईल अस्त!
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बँक ऑफ इंडियामध्ये सपोर्ट सिस्टमच्या पदांसाठी रिक्त जागा, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या