Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुची फॅन!

Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (14:47 IST)
अलीकडे डेटिंग ही सामान्य बाब झाली आहे. आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीला डेटला घेऊन जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेमात असतात आणि एकमेकांना चांगले ओळखायला लागतात तेव्हा डेटिंगचा विषय निघतो. पण अनेकजण हे पैशांच्या अडचणीमुळे आपली डेट कॅन्सल करतात आणि आपल्या पार्टनरला याबाबत आधीच सांगून आपला चार्म कमी करतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला कमी पैशात डेट एन्जॉय करण्याच्या काही खास टीप्स देणार आहोत.
 
गेट-टुगेदर
तुम्ही तुमच्या घरीच किंवा त्रिांसोबत मिळून एक छोटसे गेट-टुगेदर प्लॅन करू शकता. याने तुमच्या पार्टनरला तुम्हाला आणखीन जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. तसेच सोप्या आणि स्वस्त उपायांनीही तुम्ही डेटिंगदरम्यान विंडो शॉपिंगची मजा घेऊ शकता. तसेच घरीच चांगले पदार्थ तयार करुनही कॅन्डल लाइट डिनरही प्लॅन करू शकता. 
 
रोमॅन्टिक जागा निवडा
तुम्ही तुमची डेट रोमॅन्टिक करण्यासाठी निसर्गाचा आधार घेऊ शकता. म्हणजे बोटिंग करु शकता, स्केटिंग करु शकता, फिशिंग करु शकता. अशा जागेची निवड करा जिथे तुम्हाला निसर्गाचा अधिक आनंद घेता येईल. तेव्हाच तुमचे डेटिंग सक्सेस होऊ शकेल.
 
कुठेही एन्जॉय करा डेट
डेटिंगला केवळ दिखाव्याची किंवा बनावटीची गरज नसते. उलट जसे आहात तसे कुठेही भेटू शकता. तुम्हाला डेटिंगसाठी वेगळी जागा महत्त्वाची नाही तर तुमची सोबत महत्त्वाची आहे. केवळ मॉल किंवा हॉटेलने तुमची डेट चांगली होईल असे नाही.
 
चांगल्या गप्पा करा
हे गरजेचे नाही की, डेटला तुम्ही एखाद्या महागड्या हॉटेलमध्येच गेले पाहिजे. डेटिंगसाठी तुम्ही कोणत्याही स्वस्त ढाब्यावर किंवा स्वस्त रेस्टॉरंटमध्ये कॉफी किंवा चहाचा आनंद घेऊ शकता. तसाही हॉटेलमध्ये जाऊन खाणे हा डेटिंगचा मूळ उद्देश नाहीये. दोघे एकमेकांना जाणून घेऊ शकाल हा डेटिंगचा मुख्य उद्देश आहे. अशावेळी तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही कसे बोलता हेही तितकच महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या पार्टनरला आनंद देऊ शकतात.
 
फास्ट फूडनेही वाढेल मजा
आपल्या पार्टनरला डेटला घेऊन जाताना आपल्या खिशावर नजर टाकण्याऐवजी डोक्याने विचार करा आणि असा प्लॅन करा की तुमचा पार्टनरही खूश होईल आणि तुमचा खर्चही कमी होईल. तुम्ही लाँग ड्राइव्हला जाऊ शकता किंवा लाँग वॉकला जाऊ शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments