जर का एखादी व्यक्ती आपल्या समोर बसून मान वाकवून बोलत असल्यास समजावं की तो आपल्याशी फ्लर्ट करीत आहे. या व्यतिरिक्त लाजणे देखील फ्लर्ट करण्याचे लक्षण असू शकतात. संशोधकांच्यानुसार स्त्रिया फ्लर्ट करतात त्यावेळी त्यांचा चेहऱ्यावरील भाव सर्व काही दर्शवून जातात.
फ्लर्टिंग दरम्यान चेहऱ्यावरील भाव समजण्यासाठी फेशियल ऍक्शन कोडिंग सिस्टम नावाचे सूचक संशोधकांनी शोधले आहेत. हे तंत्र चेहऱ्यावरील संकेत शोधते जे फ्लर्टिंगची पुष्टी करतं. या मध्ये मान खाली वाकवून मिश्किल पणे हसणं, आणि त्या दरम्यान आपल्या लक्ष्याकडे अधून मधून बघणं समाविष्ट आहे.
प्रेम प्रकरणांमध्ये फ्लर्टिंग करणं हे मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संशोधकाच्या म्हणण्यानुसार फारच कमी असे लेख आहे ज्यामध्ये फ्लर्टिंगवर शोध केलेले आहेत.
मुलींच्या भावनांना न सांगता देखील समजतात लोकं -
संशोधक सांगतात की मुली फ्लर्ट करताना आपल्या चेहऱ्यावरील भावनांनी आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या काहीच बोलत नाही तरी ही पुरुषांना त्यांची ही सांकेतिक भाषा समजून जाते. हसणं हा नेहमी फ्लर्टिंगचा भाग नसतो.
पूर्वी केलेल्या संशोधनाचा आढावा घेत काही बायकांना त्यांचे मत विचारण्यात आले. काही बायका आपल्या चेहऱ्याचा भावनांनी फ्लर्ट करण्यास सक्षम होत्या. त्यांच्या या भावनांना पुरुषांनी सहजपणे ओळखले.
शोध केल्यावर आढळले की काही पुरुष आणि बायकांच्या मते ते लोकं अश्या बायका आणि पुरुषांबरोबर फ्लर्ट करतात जे दिसायला चांगले असतात आणि ज्यांनी चांगले कपडे घातलेले असतात. बायका म्हणाल्या की पुरुषांचे फ्लर्ट करण्यासाठीचे गैर मौखिक वर्तन त्यासाठी परिणामी असतात.