Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वयंपाकघरात असलेले हे 5 नैसर्गिक उत्तेजक पदार्थ काम इच्छा वाढवतील

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (16:45 IST)
भोजन आणि शारीरिक संबंध नेहमीच सर्वात आनंददायी अनुभव असल्याचे मानले गेले आहे. आता खऱ्या अर्थाने आनंद देणाऱ्या पदार्थांची कल्पना करा. होय आम्ही काम उत्तेजना देणार्‍या पदार्थांबद्दल बोलत आहोत - जे नैसर्गिकरित्या इच्छा वाढवतात. यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आनंद आधीपेक्षा जास्त वाढतो.
 
तर आज आम्ही अशा पाच फूड्सबद्दल सांगत आहोत ज्याने लिबिडो वाढवू शकते. विज्ञानही त्यांना पूर्ण पाठिंबा देते.
 
मेथी - मेथी किंवा मेथीदाणा आपल्या देसी आहारात नेहमीच समाविष्ट केले गेले आहे. दाहक आणि इच्छा वाढवणाऱ्या घटकांमुळे आयुर्वेदात याला विशेष स्थान देण्यात आले आहे. अध्ययनात आढळून आले आहे की मेथीमध्ये विशिष्ट यौगिक असतात जे शरीरात टेस्टोस्टेरॉन म्हणजे विशेष हार्मोन्स यांच्यातील संतुलन राखण्याचे काम करते. मेथी हे देसी जादुई औषध आहे जे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये इच्छा आणि उत्तेजना वाढविण्यात मदत करू शकते. तथापि जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेतात किंवा संप्रेरक-संवेदनशील कर्करोगावर उपचार घेत आहेत त्यांनी त्याचे सेवन टाळावे.
 
पिस्ता-  पिस्ता प्रोटीन, फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध मेवा आहे. याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत जसे हे रक्तदाब कमी करण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. हे इरेक्टाइल डिसफंक्शन दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. अभ्यास दर्शवतात की पिस्ता रक्तातील कोलेस्टेरॉल सुधारू शकतो आणि संपूर्ण शरीरात चांगला रक्त प्रवाह उत्तेजित करू शकतो. जे इरेक्टाइल डिसफंक्शनच्या लक्षणांपासून हळूहळू आराम देते.
 
केसर- दुधात केसर मिसळ्याने त्याची रंगत आणि तासीर दोन्ही निखरुन जाते. त्याच प्रकारे केसराचे दूध पिण्याने खाजगी जीवनात ही निखार येतो. विशेष म्हणजे केशर हे तणाव आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणूनही ओळखले जाते. केशर उत्तेजक म्हणूनही खूप प्रभावी आहे. तणाव किंवा नैराश्यामुळे ज्या लोकांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाली असते त्यांनीही केशर सेवन करावे. अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या पुरुषांनी चार आठवडे दररोज 30 मिलीग्राम केशर घेतले त्यांच्या इरेक्टाइल फंक्शनमध्ये सुधारणा होते. तसेच महिलांवर परिणाम म्हणजे त्यांची उत्तेजना आणि स्नेहन पातळी लक्षणीय वाढते.
 
टरबूज- टरबूज नैसर्गिक व्हायग्रा म्हणून ओळखले जाते. अभ्यासात असे आढळून आले की टरबूजच्या सालीमध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड सिट्रुलीन असते. हे रक्तवाहिन्यांना आराम देणाऱ्या औषधाप्रमाणे काम करते.
 आता तुम्हाला टरबूजाच्या सालीचे फायदे माहित असल्याने तुम्ही लोणचे किंवा चटणी बनवूनही त्यांचा वापर करू शकता.
 
डाळिंब- डाळिंब हे प्रेमाचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. डाळिंबाच्या आत असलेल्या अनेक लहान बिया देखील प्रजनन आणि विपुलतेचे प्रतीक म्हणून पाहिले गेले आहेत.
 अभ्यासात असे आढळून आले की डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने स्ट्रेस हार्मोन, कोर्टिसोल कमी होतो. तणाव संप्रेरकांची पातळी कमी करून, ते इच्छा आणि कार्यक्षमता वाढवते. 
अभ्यासात असे दिसून आले आहे की डाळिंबाच्या रसाचे दोन आठवडे नियमित सेवन केल्याने पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या लाळेमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी लक्षणीयरीत्या वाढली. टेस्टोस्टेरॉनवरील कमी प्रभावाचा रक्तदाब आणि मूडवर देखील सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे आपण चिंता आणि भावना संतुलित करू शकतो.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा अगदी बाजारासारखी आवळा कँडी

सानंद फुलोरामध्ये कथाकथन 'गोष्ट इथे संपत नाही...'

आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घ्या

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

पुढील लेख