मुली बहुतेक त्यांच्या आईच्या जवळच्या असतात. अशा स्थितीत भावनिक संबंध असणे सहज आहे. लग्नानंतरही हे बंधन इतकं घट्ट असत की तिला आईसोबत सगळं शेअर करावंसं वाटतं. पण लग्न झालेल्या मुलीने आईसोबत किती गोष्टी शेअर कराव्यात यावर लोकांमध्ये मतभेद आहेत. मात्र, तिला किती गोष्टी आपल्या आईला सांगायच्या आहेत हे मुलीच्या विवेकावर अवलंबून असते. जरी काही लोक म्हणतात की आईने या गोष्टी कोणत्याही मुलीला सांगू नयेत.
मुलगी लग्नानंतर सासरच्या घरात सुखी आहे की नाही. हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक आईला असते. अशा परिस्थितीत, मुलीला फोन करून दिवसभराप्रत्येक गोष्टींची विचारपूस करणे वाईट नाही. पण एकदा गृहस्थीत लागल्यावर मुलीने घरातील दिवसभराच्या प्रत्येक गोष्टी सांगणे योग्य ठरणार नाही. कारण अनेक वेळा आईला सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून घेतल्या जातात. अशा स्थितीत कोणत्या ना कोणत्या बाबतीत संशयाचे बीज पेरले जातात.
पतीशी भांडण करणे जवळजवळ प्रत्येक जोडप्यासाठी सामान्य आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी आईला आपल्या मधील झालेल्या भांडणा बद्दल सांगणे योग्य नाही. कारण भांडण किती गंभीर गोष्टींवर झाले आहे. हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. अशा परिस्थितीत आईचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. मात्र, प्रकरण गंभीर असेल तर आईला सर्व प्रकार सांगणे आवश्यक आहे.
सासू-सासऱ्यांशी आपलं नातं कस आहे. हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. मग सासूबरोबर काय संवाद झाले? हे प्रत्येक वेळी आईला सांगणे योग्य नाही. आई कोणत्याही बाबतीत बाहेरच्या माणसासारखी बोलेल. अशा परिस्थितीत सुख-शांतीने घर कसे चालवायचे याचा विचार तुम्हीच केला पाहिजे. येथे हे देखील सांगणे आवश्यक आहे की जर एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर गंभीर परिणाम होत असेल तर याबद्दल आई आणि कुटुंबाशी उघडपणे बोलणे आवश्यक आहे.