Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips: नातं जास्त काळ टिकेल की नाही, हे या 5 गोष्टींवर अवलंबवून असते जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 9 एप्रिल 2022 (23:21 IST)
नातं चालविण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही. नातेसंबंधात भांडणे होणे सामान्य आहे. बुद्धिमान लोक त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात.अनेक लोक आपल्या प्रेमसंबंधाबाबत प्रामाणिक असतात पण तरीही ते जोडीदाराचे मन समजू शकत नाहीत. प्रेमाचं हे नातं कसं घट्ट करावं हे त्यांना कळत नाही. दीर्घ आणि मजबूत नात्यासाठी या 5 गोष्टी आवश्यक आहेत. 
 
1 तडजोड करा- जोडप्यांमध्ये भांडण होत असतात. याचा अर्थ असा नाही की वादाला किंवा भांडणाला घेऊन बसू नये. असं केल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. या प्रकरणात इतरांचा सल्ला घेण्याऐवजी जोडीदारासोबत बोलून प्रकरण मिटवा. तडजोड केल्याने आपल्या नात्यातील दुरावा दूर केला जाऊ शकतो.
 
2 विश्वास ठेवा-  बरेच नाते अविश्वासामुळे नात्याला तडा देतात. नात्याला घट्ट करण्यासाठी  एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. प्रत्येक जोडप्याला प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या सोबत राहायला पाहिजे. एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. असं केल्याने नातं घट्ट होत.या समस्यांवर तोडगा सामंजस्याने काढावा. असं केल्याने आपसातील वाद आणि मतभेद होणार नाही. 
 
3 प्रामाणिक राहा- जोडीदाराशी सर्व गोष्टी सामायिक केल्याने नातं घट्ट होऊन पुढे वाढते. आपल्याला जोडीदाराची काही सवय आवडत नसल्यास त्याला मोकळेपणे सांगा. नात्याला प्रामाणिकपणे पुढे वाढवा. असं केल्याने नात्यात दृढता येईल. 
 
4 आवड-निवड जाणून घ्या - नात्यात एकमेकांची आवड-निवड जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या आवडी-निवडीनुसार जोडीदाराने वागल्याने काही खास असल्याचा अनुभव जाणवतो आणि आपल्या नात्यात दृढता येते. 
 
5 एकमेकांना अधिक वेळ द्या- चांगल्या नात्यासाठी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा. जास्त दिवसांचे अंतर नात्यात दुरावा आणण्याचे काम करते. आपण  कामात कितीही व्यस्त असलात तरी आपल्या जोडीदारासाठी नक्कीच वेळ काढा. त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस घालवा, यामुळे आपले नाते अधिक घट्ट होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

प्रेरणादायी कथा : लाल बहादूर शास्त्रींची हृदयस्पर्शी कहाणी

स्वादिष्ट मॅगी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी

फक्त मीठच नाही तर या ४ गोष्टी खाल्ल्याने देखील रक्तदाबही वाढू शकतो

पुढील लेख
Show comments