rashifal-2026

चिकन डोसा रेसिपी

Webdunia
सोमवार, 20 जानेवारी 2025 (12:44 IST)
साहित्य-
2 कप तांदूळ
1/2 कप उडीद डाळ
1/2 चमचा मेथी दाणे
पाणी
चवीनुसार मीठ
250 ग्रॅम बोनलेस चिकन  
1 कांदा
2 टोमॅटो
2 हिरवी मिरची
1 इंच आले
5-6 लसूण पाकळ्या
1/2 कप दही
1/2 चमचा हळद
1 चमचा तिखट
1 चमचा धणेपूड
1/2 चमचा गरम मसाला
1 चमचा लिंबाचा रस
2 चमचा तेल
कोथिंबीर
ALSO READ: चायनीज चिकन रेसिपी
कृती -
सर्वात आधी तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवावे. आता हे मिक्सरमधून बारीक काढून घ्यावे व बॅटर बनवून घ्यावे. बॅटर मध्ये थोडे पाणी घालावे. आता हे बॅटर  कमीतकमी सहा तास तसेच राहू द्यावे. यानंतर आता यामध्ये मीठ मिक्स करावे. आता एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा घालून परतवून घ्यावे. आता त्यांमध्ये आले लसूण पेस्ट घालून हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे.तसेच आता त्यामध्ये टोमॅटो घालावे.आता यामध्ये हळद,तिखट,धणेपूड आणि मीठ घालावे. मसाले चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये चिकनचे छोटे छोटे तुकडे घालावे. तसेच पाच मिनिट शिजू द्यावे. आता यामध्ये दही घालून चिकन शिजू द्यावे. चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून कोथिंबीर घालावी. आपला चिकन मसाला तयार झाला आहे. आता तवा गरम करून त्यामध्ये डोसा बॅटर घालून डोसा पसरवून घ्यावा. डोसा तयार झाल्यानंतर, त्यात तयार केलेला चिकन मसाला घाला आणि डोसा घडी करा. तयार डोसा प्लेट मध्ये काढून घ्यावा. तर चला तयार आहे आपला चिकन डोसा रेसिपी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे २०२६

Vegetable Upma Recipe सकाळी नाश्त्यासाठी उत्तम आरोग्यदायी रेसिपी

लाल केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या

बायोटेक्नॉलॉजी एम.फिल कोर्स मध्ये करिअर करण्यासाठी पात्रता सर्व माहिती जाणून घ्या

Shiv Jayanti Wishes 2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments