गोअन फिश करी बनविण्यासाठी साहित्य - 1 लिंबू, 2 मीडियम आकाराच्या फिश, स्वादानुसार मीठ, मसाला तयार करण्यासाठी 1 कांदा कापलेला, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, 1/2 टी स्पून जिरं, 1/2 टी स्पून हळद, 5 कश्मीरी लाल मिरच्या, 1 टेबल स्पून अख्खे धणे, 1 नारळ किसलेलं, दोन चमचे चिंचेचं पाणी,
गोअन फिश तयार करण्याची कृती-
मिठ आणि लिंबू घालून मासे 10 मिनिटे मॅरीनेट करा. दरम्यान सर्व मसाले वाटून घ्या. त्यात थोडे पाणी घाला 3. मसाल्यात कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. गॅसवर पॅन ठेवा आणि मसाले घाला. मसाले 10 मिनिटे गॅसवर शिजवा आणि सतत ढवळत राहा जेणेकरून ते जळणार नाही. मसाल्यामध्ये मॅरीनेट केलेले मासे घाला. त्यात अजून थोडं पाणी घाला. गरम उकडलेल्या फिश करीला भाताबरोबर सर्व्ह करा.