Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mutton Rice चविष्ट मटण राईस

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (13:30 IST)
साहित्य : ४ वाटी भिजलेले तांदूळ, अर्धा किलो- मटण, २ वाटय़ा कोथिंबीर, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ काळीमिरी, २ वेलची, तमालपत्र, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा कप दही, १ लिंबाचा रस, २ चमचे पुदिना, ४ मोठे चमचे तेल, २ मोठे कांदे उभे चिरलेले, अर्धा चमचा हळद , १ चमचा आलं-लसूण पेस्ट, २ उकडलेली अंडी, मीठ चवीनुसार.
 
कृती : मटणामध्ये मीठ व हळद टाकून कुकरमध्ये ४ शिट्या करून घेणे. एका मोठय़ा पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात शहाजिरं, वेलची, दालचिनी, काळीमिरी टाकावी. खडा मसाला भरून झाल्यानंतर त्यात कांदे लालसर परतून घ्यावेत. मिक्सरमध्ये आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून ते मिश्रण त्या पातेल्यात टाकणे. दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी टाकणे. हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात केवळ भिजलेले तांदूळ, फेटलेले दही, बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस टाकून भात शिजून ठेवणे. भात अर्धा शिजल्यानंतर त्यात शिजलेले मटण टाकणे. भात शिजत आल्यानंतर गॅसवर तवा गरम करणे व मंद आचेवर झाकण लावून भात मुरायला ठेवणे. दहा मिनिटानंतर गॅस बंद करणे. उकडलेल्या अंडय़ाने भात गार्निश करणे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पाय सुंदर आणि मऊ बनवण्यासाठी, या टिप्स अवलंबवा

वस्तू ठेवून विसरता, या व्हिटॅमिनची कमी होऊ शकते

जेव्हा पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागतात, तेव्हा हे 3 रिलेशनशिप नियमांमुळे नातेसंबंध सुधरतील

मधुमेहाच्या रुग्णांनी या 4 भाज्या कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढेल

पंचतंत्र कहाणी : बेडूक आणि बैलाची गोष्ट

पुढील लेख
Show comments