rashifal-2026

मोटलेचे मासे

Webdunia
पाच बांगडे, अर्धा नारळ, एक इंच आले, एक लसणीचा कांदा, २० कोकम सोलं, १५ संकेश्वरी मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळदपूड, दोन चमचे धणे, एक चमचा बडीशेप, १५ त्रिफळे, हळदीची १० पाने, कुडय़ाची किंवा बदामाची आठ पाने, गुंडाळण्यासाठी सुतळ.

कृत ी- प्रथम संकेश्वरी सुक्या मिरच्या, धणे, बडीशेप, त्रिफळे पाण्यात भिजत ठेवावी. त्यानंतर बांगडे साफ करून तीन तुकडे करावे व त्यांना मिठ, हळद लावून ठेवावी. त्यानंतर नारळाचा खव, आले, लसूण वि भिजत ठेवलेले साहित्य मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावे व ती चटणी, कोकम, बांगडे एकत्र कालवू ठेवावे.

नंतर कुडाच्या/ बदामाच्या पानांची मोठी पत्रावळ करून ठेवावी व त्यावर हळदीची पाने व्यवस्थित मांडून ठेवावीत. त्याच्यावर चटणी लावलेले बांगडे व्यवस्थित ठेवून पत्रावळ गुंडाळून सुतळीने बांधून मोटली बनवावी व ती गॅसवरील खोलगट तव्यावर ठेवून गॅस मोठा करावा. त्या तव्यावर दुसरा खोलगट तवा ठेवावा.

२० मिनिटांनी तव्यातील मोटली परतावी व पुन्हा २० मिनिटांनी गॅस बंद करावा. तवा थंड झाल्यावर मोटली बाहेर काढावी.
मोटलेचे मासे गरम तांदळाच्या भाकरीसोबत चविष्ट लागतात.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Career in M.Sc. in Community Health Nursing :एमएससी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे अप्रतिम फेस पॅक घरच्या घरी बनवा

जुनी उशी तुमच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते, दुष्परिणाम जाणून घ्या

या सोप्या योगासनांच्या मदतीने घरच्या घरी खांदेदुखीवर उपचार करा

लघु कथा : गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

पुढील लेख
Show comments